घरताज्या घडामोडीCoronavirus: काँग्रेसने केंद्र सरकारकडे केल्या १० मागण्या!

Coronavirus: काँग्रेसने केंद्र सरकारकडे केल्या १० मागण्या!

Subscribe

जगभरात करोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. देशात देखील करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत जगभरात करोनाबाधितांचा आकडा ३ लाखांपेक्षा जास्त झाला आहे. तसंच देशभरात देखील करोनाचा आकडा ३९० पेक्षा जास्त झाला आहे. यापैकी महाराष्ट्रात सर्वाधित जास्त करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत देशभरात करोनामुळे ९ नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. एका बाजूला करोनामुळे देशात भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र दुसरीकडे काँग्रेसने मोदी सरकार समोर १० मागण्या ठेवल्या आहेत. काँग्रेसचे रणदीप सुरजेवाला यांनी या १० मागण्या केल्या आहेत.

काँग्रेसने मोदी सरकारला केल्या या मागण्या…

१) करोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी आरोग्य विभागात काम करणाऱ्यांना त्यांच्या सुरक्षेसाठी एन ९५ मास्क, गोव्हज, फेस शील्ड, गाॅगल्स, हँड कव्हर्स, रबराचे बुट इत्यादी प्रकारच्या वस्तू उपलब्ध करून द्याव्यात.

- Advertisement -

२) करोनाशी दोन हात करणाऱ्या देशातील डाॅक्टर्स, नर्सेस आणि त्यांना मदत करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विशेष आर्थिक मदत दिली पाहिजे. याकरिता सरकारने तातडीने घोषणा करावी.

३) करोनाबाधितांची संख्या पाहता केंद्र सरकारने व्हेंटीलेटरची संख्या वाढवावी. सध्या १३० कोटीच्या देशात आताच्या घडीला फक्त ३० हजार व्हेंटीलेटर उपलब्ध आहेत.

- Advertisement -

४) करोनाचा संसर्ग टाळण्याकरिता रुग्णांसाठी आयसोलेसन बेड्सची व्यवस्था करावी.

५) करोना तपासणी केंद्राची संख्या वाढवावी.

६) देशभरात मास्क आणि सॅनिटायझर्सचा काळाबाजर वाढला आहे. हा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करावी. तसंच भाजीपालांमध्ये दर वाढवणाऱ्यांवर देखील कारवाई करावी.

७) तसंच मजुर, कामगार अशा लाखो लोकांना सरकारने आर्थिक मदत करावी.

८) शेतकऱ्यांना करोनामुळे आणखी त्रस्त झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी.

९) लघू आणि मध्यम व्यासायिकांच मोठ नुकसान झालं आहे. त्यांना देखील सरकारने विशेष पॅकेज जारी करावे.

१०) जे लोक इएमआय भरत आहे त्यांचा इएमआय स्थगित करावा.


हे ही वाचा- Corona Breaking : महाराष्ट्रात रुग्णांची संख्या ८९वर! मुंबईत आणखीन एकाचा मृत्यू


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -