बीडमध्ये संदीप क्षीरसागर यांनी पकडले बोगस मतदार

बीडमध्ये संदीप क्षीरसागर यांनी पकडले बोगस मतदार

विधानसभा निवडणूकीसाठी आज राज्यभरात मतदान सुरू आहे. राज्यभरात लोकशाहीचा उत्सव मोठ्या उत्साहात सुरू असताना अनेक ठिकाणी गालबोट लागले आहे. काही ठिकाणी एव्हीएम मशीन बंद पडल्याच्या तक्रारी आल्या तर काही ठिकाणी बोगस मतदान केल्याचे उघड झाले. बीडमध्ये बोग मतदानावरून दोन गटात चांगलीच जुंपली. राष्ट्रवादीचे उमेदवार संदीप क्षीरसागर यांनी बोगस मतदान करणाऱ्यांना पकडत मतदान केंद्रावर गोंधळ घातला. सध्या हा व्हीडीओ व्हायरल होत आहेत.

पाटोदा मतदारसंघातून बीड मतदारसंघात बोगस मतदार मतदानासाठी आणल्यााचा आरोप यावेळी केला गेला. या मतदारांची विचारणा केली असता १० ते १५ मतदार जयदत्त क्षिरसागर यांच्या संस्थेतील कर्मचारी असल्याचे समजले. ओळखपत्रातील फोटो आणि मतदार यादीतील फोटो जुळत नसल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. यावेळी राष्ट्रवादीचे उमेदवार संदीप क्षीरसागर उपस्थित होते. सध्या हे मतदार पोलिसांच्या ताब्यात आहेत. हे मतदार खरच जयदत्त क्षिरसागर यांच्या संस्थेतील आहेत का या ची पोलिस चौकशी करत आहेत. दरम्यान जयदत्त क्षीरसागर यांनी हे आरोप फेटाळले आहेत.

काय आहे व्हिडीओत

बीड शहरातील बालेपीर मधील इंदिरा माध्यमिक विद्यालयात मतदान केंद्रावर हा प्रकार घडला. संदीप क्षीरसागर यांनी आरोप करत बोगस मतदान होत असल्याचा दावा केला. या बाबतीत थेट मतदारांना अडवून दमदाटी केली असे व्हिडिओमधून दिसत आहे. मतदारांना आडवले आहे, मात्र तसे पाहिले तर या मतदारांचे नाव मतदार यादीत आहे. संदीप क्षीरसागर यांनी केलेले आरोप पाटोदा मतदारसंघांमधून बीड मतदारसंघांमध्ये मतदानासाठी बोगस मतदार आणल्याचा दावा केला आहे.शिक्षण संस्थेवरील कर्मचारी यांच्यासह 20 लोकांची यादी दाखवत आहेत.

काका- पुतण्यात वाद

बीड मतदारसंघात काका-पुतण्या अशी लढत होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून संदीप क्षीरसागर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेनेकडून जयदत्त क्षीरसागर निवडणूकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे निवडणूकीच्या रिंगणात काका- पुतण्या एकमेंकांसमोर उभे राहिले आहेत. मात्र अशं असलं तरी दोघही एकाच घरात राहतात. बीडमधील नगर रोडवर त्यांचा बंगला आहे. बीड नगरपालिकेच्या निवडणूकीवरून क्षीरसागर कुटूंबात फूट पडली. मागच्या दोन वर्षांपासून संदीप क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपले चांगले बस्तान बसवले आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकीत सुद्धा काका-पुतण्या एकमेकांविरोधात उभे ठाकले होते.

First Published on: October 21, 2019 5:26 PM
Exit mobile version