निवडून आलेले ते इतर ‘२९’ आमदार आहेत तरी कोण?

निवडून आलेले ते इतर ‘२९’ आमदार आहेत तरी कोण?

प्रातिनिधिक छायाचित्र

चौदाव्या विधानसभेसाठी महाराष्ट्रात निवडणुका आणि मतमोजणी संपलेली आहे. लोकशाहीत लोक निर्भीडपणे आपला मतदानाचा हक्क बजावतात. मस्तवालांना सत्तेतन खाली खेचतात तर प्रबळ विरोधकांना सत्तेवर बसवतात. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीतही सत्ताधाऱ्यांना किचिंतसा धक्का देत मतदारांनी प्रत्येक पक्षाला आत्महपरिक्षण करायला भाग पाडले आहे. भाजप पक्षाने यावेळी महायुती २०० च्या पुढे जाणार अशी वल्गना करुनही त्यांना हा आकडा गाठता आला नाही. याचे प्रमुख कारण म्हणजे बंडखोरी. तब्बल १३ अपक्ष आमदार यावेळी निवडून आले आहेत. तसेच १६ इतर पक्षांचे असे एकूण २९ आमदार प्रमुख पक्षांच्या व्यतिरीक्त इतर म्हणून निवडून आले आहेत.

पाहा कोण आहेत ते इतर २९ –

साक्री – मंजुळा गावित_अपक्ष

मुक्ताईनगर – चंद्रकांत पाटील_अपक्ष

रामटेक – आशिष जैस्वाल_अपक्ष

भंडारा – नरेंद्र भोंडेकर_ अपक्ष

गोंदिया – विनोद अगरवाल_अपक्ष

मीरा भाईंदर – गीता जैन_अपक्ष

करमाळा – संजय शिंदे_अपक्ष

बार्शी – राजेंद्र राऊत_अपक्ष

इचलकरंजी – प्रकाश आवाडे_अपक्ष

शिरोळ – राजेंद्र पाटील_येड्रावकर_अपक्ष

उरण – महेश बोल्दी – अपक्ष

इचलकरंजी – प्रकाश आवाडे – अपक्ष

चंद्रपूर – किशोर जोगेवार – अपक्ष

धुळे शहर – फारूक शाह_एमआयएम

मालेगाव मध्य – मोहम्मद इस्माईल _एमआयएम

बोईसर – राजेश पाटील_बविआ

नालासोपारा – क्षितीज ठाकूर_बविआ

वसई – हितेंद्र ठाकूर _बविआ

डहाणू – विनोद निकोले _माकप

शाहूवाडी – विनय कोरे _जनसुराज्य

नेवासा – शंकरराव गडाख_क्रांतिकारी शेतकरी पार्टी

कल्याण ग्रामीण – राजू पाटील _मनसे

लोहा – श्यामसुंदर शिंदे _शेकाप

मेळघाट – राजकुमार पटेल _ प्रहार जनशक्ती पार्टी

अचलपूर – बच्चू कडू _ प्रहार जनशक्ती पार्टी

गंगाखेड – रत्नाकर गुट्टे _रासप

भिवंडी पूर्व – रईस कासम शेख _सपा

मानखुर्द शिवाजी नगर – अबु आझमी _सपा

मोर्शी – देवेंद्र भुयार _ स्वाभिमानी पक्ष

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत केवळ ७ अपक्ष आमदार निवडून आले होते. तर इतर पक्षांचे मिळून ८ आमदार निवडून आले होते. मात्र यावेळी भाजप-शिवसेना युती झाल्यामुळे सत्ताधारी पक्षातील अनेक नाराज उमेदवारांनी बंडखोरी केली. काहींनी वेगळे लढण्याचा निर्णय घेतला. त्यात त्यांना यश आल्याचे दिसून येत आहे.

First Published on: October 25, 2019 2:31 PM
Exit mobile version