वरळीत मतदानावर बहिष्कार

वरळीत मतदानावर बहिष्कार

लवकरच होणार निवडणुकीची घोषण

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी नुकतेच वरळी मतदार संघातून निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली. आदित्य ठाकरे शिवसेनेकडून विधानसभेची निवडणूक लढवणार असून वरळी मतदार संघात आदित्य ठाकरेंच्या प्रचाराला सुरूवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे वरळीत मतदानावर बहिष्कार घातला जात आहे. वरळीतील श्रीराम मिल नाका परिसरातील झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प सात वर्षांपासून रखडला आहे. त्यावर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे वरळी धोबीघाट घर बचाव संघर्ष समितीने विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

यासाठी घालण्यात आला मतदानावर बहिष्कार

गेल्या सात वर्षांपासून श्रीराम मिल नाका परिसरातील झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प रखडला आहे. याबाबत लोकप्रतिनिधींकडे दाद मागितल्यानंतरही समस्या कायम राहिल्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या मतदनावर बहिष्कार टाकरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या प्रकल्पातील सुमारे ३ हजार रहिवासी मतदानावर बहिष्कार टाकणार आहेत. वरळीतील गांधीनगर परिसरातील झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पासाठी संबंधित विकासकाने २०१२ मध्ये जुनी घरे तोडली. तसेच रहिवाशांना पर्यायी वास्तव्यासाठी विकासकाकडून घरभाडे मिळणार होते. मात्र, त्याने तीन वर्षांपासून घरभाडे थकवले आहे.

याबाबत , रहिवाशांनी स्थानिक लोकप्रतिनिधींकडे मध्यस्थी करण्याची मागणी केली. मात्र, विकासकाकडे पैसे नसल्याचे लोप्रतिनिधींकडून सांगण्यात आले, असे समितीचे म्हणणे आहे. परिणामी रहिवाशांनी विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकला आहे.


हेही वाचा – युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे म्हणतात; ‘केम छो वरली!’


 

First Published on: October 4, 2019 10:55 AM
Exit mobile version