घरमुंबईयुवासेना प्रमुख आदित्य ठाकरे म्हणतात; 'केम छो वरली!'

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे म्हणतात; ‘केम छो वरली!’

Subscribe

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी नुकतेच वरळी मतदार संघातून निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली. आदित्य ठाकरे शिवसेनेकडून विधानसभेची निवडणूक लढवणार असून वरळी मतदार संघात आदित्य ठाकरेंच्या प्रचाराला सुरूवात झावल्याचे पाहायला मिळत असून वरळीमधील चौका-चौकात मराठी, हिंदी, तेलगु आणि गुजराती भाषेत ‘वरळीकर कसे आहात?’, असे पोस्टर लावण्यात आले आहेत. मात्र, यासर्व भाषेत जरी पोस्टर असले तरी वरळी नाक्यावरील गुजराती भाषेतील ‘केम छो वरली!’ असा प्रश्न विचारणारं पोस्टर सर्वांचेच लक्ष वेधून घेताना दिसत असले तरी त्यामुळे शिवसेनेवर आता मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे.

इतर भाषिक मतदारांनाही आकर्षित करण्याचा प्रयत्न

मराठी हक्कासाठी लढणारा पक्ष अशी ओळख असलेल्या शिवसेनेकडून मुंबईत ‘केम छो वरली’ अशी पोस्टरबाजी करण्यात आल्याने सोशल मीडियावर चांगल्याच प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी केल्या आहेत. शिवसेना या पोस्टरच्या माध्यमातून गुजराती मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असून त्यासोबतच वरळीतील इतर भाषिक मतदारांनाही आकर्षित करण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून सुरु आहे.

- Advertisement -

पोस्टरवरुन शिवसेना आणि आदित्य ठाकरेंना लक्ष्य

‘केम छो वरली!’ या पोस्टरमुळे सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात आदित्य ठाकरे यांना ट्रोल केले जात आहे. एकीकडे केम छो वरली या पोस्टरचे फोटो व्हायरल होत असून अनेकांनी या गुजराती पोस्टरवरुन शिवसेना आणि आदित्य ठाकरेंना लक्ष्य करण्यात आले आहे.


आदित्य ठाकरेंचा भाऊ देखील निवडणूक लढवणार?


गुजराती प्रेम दाखवल्याने नेटीझन्सने केले ट्रोल

वरळी मतदारसंघात गुजराती समाजाची मोठ्या प्रमाणावर मतदारांची संख्या असल्याने ही सर्व मतं आदित्य ठाकरे यांना मिळावी यासाठी शिवसेनेने ‘केम छो वरली’ अशी युक्ती वापरून फक्त मतं मिळावी याकरिता ही खेळी केली असल्याचे म्हटल्याचे दिसत आहे. तसेच, या पोस्टरमुळे शिवसेने आगामी निवडणूकीच्या तोंडावर गुजराती प्रेम दाखवल्याने नेटीझन्सने चांगलेच ट्रोल करत शिवसेनेवर हल्लाबोल केल्याचे दिसत आहे.

- Advertisement -

 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -