शिवसेनेचे मतदारसंघ मुख्यमंत्री ठरवणार – उद्धव ठाकरे

शिवसेनेचे मतदारसंघ मुख्यमंत्री ठरवणार – उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपा युती होणार का? आणि युती झाली तर शिवसेना कोणत्या जागा आणि किती जागा लढणार यावर सध्या जोरदार चर्चा सुरू असताना आता खुद्द शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक नवीन मार्ग काढला आहे. सध्या सुरू असलेल्या उलट सुलट चर्चा सुरू असताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना उपहासात्मक टोला लगावला आहे.

नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे 

दरम्यान, युतीबाबत उद्धव ठाकरे यांना पत्रकारांनी विचारले असता उद्धव ठाकरे यांनीयुतीची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. तसेच आता मी नवीन मार्ग काढला आहे. ज्यामध्ये मी मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे की, ‘तुम्हीच कोणते ते मतदारसंघ ठरवा आणि मला यादी द्या, ती यादी मी शिवसैनिकांसमोर ठेवेन’, असा उपहासात्मक टोला उद्धव ठाकरे यांनी यावेळी भाजपाला लगावला.

भास्कर जाधव यांचा पक्षप्रवेश 

राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणाऱ्या कोकणातील गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी आजशिवसेनेत प्रवेश केला. मातोश्रीवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थिती त्यांनी शिवबंधन बांधले. यावेळी माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी ही प्रतिक्रिया दिली. यावेळी भास्कर जाधव यांच्याबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, भास्कर जाधव हे एक लढवय्या शिवसैनिक आहेत. ते शिवसेना पक्षात परत येत आहेत. ज्याप्रमाणे तुम्ही १५ वर्षांपूर्वी शिवसेनेत असताना नागरिकांच्या हिताची बाजू लावून धरली तसेच यापुढेही कराल, ही आशा उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

First Published on: September 13, 2019 3:12 PM
Exit mobile version