घरमुंबईएन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा करणार शिवसेनेत प्रवेश

एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा करणार शिवसेनेत प्रवेश

Subscribe

चकमकफेम पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर अखेर सक्रिय राजकारणात प्रवेश करण्याचे निश्चित केले आहे. प्रदीप शर्मा आज, शुक्रवारी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. सायंकाळी ६ वाजता मातोश्री येथे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शर्मा हे शिवबंधन बांधणार असल्याचे समजते. तसेच त्यांना नालासोपारा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून उमेदवारी दिला जाणार असल्याचेही सांगितले जात आहे.

निवडणुकीसाठी घेतली स्वेच्छानिवृत्ती 

एन्काऊंटर स्पेशालिस्ट आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांचा स्वेच्छा सेवानिवृत्ती अर्ज २१ ऑगस्ट २०१९ पासून मंजूर करण्यात आला आहे. त्यासंदर्भातील शासन आदेश गृहविभागाचे सचिव व्यंकटेश भट यांच्या सहीनिशी राज्य सरकारने जारी केला. त्यामुळे प्रदीप शर्मा आता निवडणूक लढवण्यासाठी सज्ज झाले आहेत. पोलीस सेवेतून कागदोपत्री निवृत्त होईपर्यंत त्यांना निवडणूक अर्ज भरता येणार नव्हता. प्रदीप शर्मा यांनी ८ जुलै रोजी पोलीससेवेचा राजीनामा दिला होता. शर्मा यांचा राजीनामा बरोबर ४५ दिवसांनी मंजूर करत गृह विभागाने त्यांना त्यांच्या इच्छेनुसार पोलीस सेवेतून मुक्त केले.

- Advertisement -

ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना पालघर जिल्ह्यावर पकड बसवायची आहे. त्यासाठी वसई विरार आपल्या ताब्यात घेण्याचे शिंदे यांचे प्रयत्न आहेत. लोकसभा निवडणुकीत राजेंद्र गावीत यांना नालासोपारा विधानसभा मतदारसंघातून 26 हजार मते जास्त मिळाली आहेत. पण, विधानसभा निवडणुकीत ठाकूरांच्या बहुजन विकास आघाडीला टक्कर देणारा उमेदवार सेनेकडेही नाही. शर्मा शिवसेनेत यायला तयार झाल्यानंतर शिंदे यांनी त्यांना नालासोपार्‍यातून लढण्याची सूचना केली. विशेष म्हणजे शर्मा यांनी होकार दिल्याने पालघर जिल्ह्यातील एका मतदारसंघात तुल्यबळ लढत देणारा उमेदवार मिळाल्याचे शिंदे यांचे मत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -