मंत्रिपदाचे शपथ घेणारे डॉ. नितीन राऊत यांचा परिचय

मंत्रिपदाचे शपथ घेणारे डॉ. नितीन राऊत यांचा परिचय

महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा शपथविधी सोहळा आज मुंबईच्या शिवाजी पार्क या मैदानावर पार पडला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि काँग्रेसचे मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्रिपदासाठी नितीन राऊत यांचे नाव ऐनवेळी पुढे आले. नितीन राऊत हे विदर्भातील काँग्रेसचे मोठे नेते आहेत. ते महाराष्ट्र काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष आहेत. विशेष म्हणजे महाआघाडीचे सरकार असताना ते रोजगार हमी आणि जलसंधारण विभागाचे कॅबिनेट मंत्री देखील होते.

नितीन राऊत हे उच्च शिक्षित आहेत. त्यांचे एम.ए.पी.एचडी. पर्यंत शिक्षण घेतले आहे. नागपूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून ते १९९९, १००४ आणि २००९ साली विधानसभा निवडणुकीत जिंकून आले आहेत. पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसाय, गृह, जेल, राज्य कामगिर आणि उत्पादन शुल्क विभागाचे कॅबिनेट मंत्रिपद भूषविले आहे. ‘संकल्प’ या स्वयंसेवी संस्थेमार्फत त्यांनी सामाजिक कार्य केले आहे. त्याचबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारीत ‘डॉ. बाबासाहेब कुटुंब नियोजनावरील विचार आणि आधुनिक भारताशी संबंध ‘ असे पुस्तक लिहले आहे.

First Published on: November 28, 2019 8:19 PM
Exit mobile version