अभिजीत बिचुकलेंना निवडणूक आयोगाचा दणका

अभिजीत बिचुकलेंना निवडणूक आयोगाचा दणका

अभिजीत बिचुकले

बिग बॉस मराठी सिझन दोनचा स्पर्धक अभिजीत बिचुकले वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवीत असून सध्या ते मतदारसंघातून जोरदार प्रचार करीत आहेत. मात्र, या प्रचारा दरम्यान, त्यांना निवडणुक आयोगाने चांगलाच दणका दिला आहे. निवडणूक आयोगाला दैनदिन प्रचाराचा हिशोब द्यावा लागतो. मात्र, अभिजीत बिचुकलेंनी दिवसाचा हिशोब न दिल्यामुळे निवडणुक आयोगाने त्यांना नोटीस बजावली आहे. तसेच लोकप्रतिनिधीत्व अधिनियम अंतर्गत वरळी येथील बिचकुले यांच्यासह दोन उमेदवारांना नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती वरळी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी दिली आहे.

या दोघांनाही बजावण्यात आली नोटीस

लोकप्रतिनिधीत्व अधिनियम अंतर्गत वरळी येथील तीन उमेदवारांना आज निवडणूक आयोगाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. वरळी विधानसभा मतदारसंघातील तीन उमेदवारांनी निश्चित केलेला दैनिक खर्च सादर न केल्यामुळे त्यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. या दैनिक खर्चात दिवसभरात होणारा खर्च, वह्यांची नोंद आदी खर्च सादर न केल्याने अभिजीत वामनराव बिचकुलेंसह विश्राम तिडा पाडम आणि महेश पोपट खांडेकर या तीन उमेदवारांना नोटीस बजावण्यात आली आहे.


हेही वाचा – आदित्य ठाकरेंच्या विरोधात अभिजीत बिचुकले निवडणुकीच्या मैदानात


First Published on: October 10, 2019 9:40 PM
Exit mobile version