घरमुंबईआदित्य ठाकरेंच्या विरोधात अभिजीत बिचुकले निवडणुकीच्या मैदानात

आदित्य ठाकरेंच्या विरोधात अभिजीत बिचुकले निवडणुकीच्या मैदानात

Subscribe

बिग बॉस मराठी सिझन दोनचा स्पर्धक अभिजीत बिचुकले शिवसेनेच्या आदित्य ठाकरे यांच्याविरोधात विधानसभा लढविणार आहे. अभिजीत बिचुकले यांनी आज वरळी विधानसभेसाठी आपला अर्ज सादर केला आहे. बिचुकले यांनी आजवर साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांच्याविरोधात निवडणूक लढवून प्रसिद्धी मिळवली होती. आता आदित्य ठाकरेंविरोधात उतरल्यामुळे बिचुकले पुन्हा चर्चेचा विषय ठरले आहेत.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अभिजीत बिचुकले यांनी सातारा आणि सांगली मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. ‘महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री मीच होणार’, अशी इच्छा बिचुकले यांनी अनेकदा बोलून दाखवली आहे. यावेळी विधानसभेच्या २८८ जागा लढविण्याची भूमिका त्यांनी काही दिवसांपूर्वी मांडली होती. मात्र आता वेळेअभावी २८८ मतदारसंघात निवडणूक लढविणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

अभिजीत बिचुकले यांनी साताऱ्यातील दोन्ही राजेंवर टीका केली. दोन्ही राजे टोलनाक्यावरुन भांडत आहेत. त्यांचे कार्यकर्ते क्षुल्लक करणांवरुन संघर्ष करत आहेत. त्यामुळे यावेली सातारा मधील उमेदवारांनी विचार करुन विधानसभा आणि लोकसभेसाठी मतदान करावे, असे आवाहन बिचुकले यांनी केले आहे.

एक प्रतिक्रिया

टिप्पण्या बंद आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -