सत्तास्थापनेबाबतचे सर्वाधिकार शरद पवार यांना बहाल – नवाब मलिक

सत्तास्थापनेबाबतचे सर्वाधिकार शरद पवार यांना बहाल – नवाब मलिक
शिवसेनेचा सरकार स्थापनेचा दावा आमदारांच्या संख्याबळा अभावी फसल्यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काल, सोमवारी तिसरा मोठा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रित केले. तसे पत्रही राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांना देण्यात आले. त्यानुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, धनंजय मुंडे आदी नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली. आम्हाला मंगळवारी ८.३० वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. आमचा मित्र पक्ष काँग्रेससोबत चर्चा करून आम्ही सत्ता स्थापनेबाबत लवकरात लवकर राज्यपालांना कळवू, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्यपालांच्या भेटीनंतर पत्रकारांना सांगितले. राज्यपाल यांनी पत्र पाठवून राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांना सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण दिले.
A view of the sea
Rashmi Mane

सायंकाळी ५ वाजता काँग्रेसची शरद पवार यांच्यासोबत बैठक होईल – मलिक .

Rashmi Mane

काँग्रेससोबत चर्चा करून योग्य निर्णय घेऊ – नवाब मलिक

Rashmi Mane

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये ठराव करण्यात आला की पर्यायी सरकार निर्मितीसाठी शरद पवार यांना अधिकार देण्यात आले आहेत – नवाब मलिक

Rashmi Mane

नवाब मलिक माध्यमांशी संवाद साधत आहेत

Rashmi Mane

अमित शहा, राजनाथ सिंग, निर्मला सीतारमण बैठकी संपल्यानंतर निघाले

First Published on: November 12, 2019 7:45 AM
Exit mobile version