मतदान केंद्रावर हेल्पडेस्क

मतदान केंद्रावर हेल्पडेस्क

विधानसभा निवडणुकांसाठी तुमच नाव मतदार यादीमध्ये नसेल तर यंदा मतदारांच्या मदतीला हेल्प डेस्क असणार आहे. निवडणुक आयोगाकडून हेल्प डेस्कसाठीचा हा पहिलाच पुढाकार हाती घेण्यात आला आहे. उमेदवाराला मतदार यादीतले नाव शोधण्यासाठी हा डेस्क मदत करणार आहे.

मुंबई शहरातील १० विधानसभा क्षेत्रातील मतदान केंद्रावर हेल्प डेस्क उभारण्यात येणार आहे. प्रत्येक हेल्प डेस्कसाठी एक लॅपटॉपही देण्यात येणार आहे. त्यामुळे मतदारांना आपले मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी सोयीचे होईल. एरव्ही मतदार यादीत नाव न सापडल्याने जी तारांबळ उडते त्यापेक्षा मतदारांना या सोयीमुळे आपल्या मतदान केंद्रावर जाण्याची सुविधा होईल.

असे शोधा मतदार यादीत नाव-https://ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर इलेक्ट्रोल सर्च इंजिनवर क्लिक करा. नावानुसार आणि आयडी कार्डनुसार इथे नाव तपासता येते. https://www.nvsp.in/ या संकेतस्थळावर गेल्यानंतर ‘सर्ज युवर नेम इन इलेक्टोरल रोल’वर क्लिक करा. ‘राष्ट्रीय मतदाता सेवा पोर्टल में आपला स्वागत है’ असे वाक्य झळकेल.

First Published on: October 21, 2019 5:47 AM
Exit mobile version