भर पावसात पवारांची सभा, पण अमित शहांचा मात्र काढता पाय!

भर पावसात पवारांची सभा, पण अमित शहांचा मात्र काढता पाय!

अमित शहा शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा साताऱ्यामध्ये भर पावसात सभेत भाषण करत असल्याचा व्हिडिओ आणि त्यासंदर्भातलं वृत्त राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलं होतं. पावसात भिजणारी शरद पवारांची छबी दिवसभर सोशल मीडियावर चर्चेत होती. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष भर पावसात देखील सभा घेत असताना भाजपच्या अध्यक्षांनी मात्र पावसामुळे सभा रद्द केल्याचं चित्र आहे. त्याच ठिकाणी सकाळी पाऊस पडत असून सुद्धा पुन्हा एकदा शरद पवारांनी सभा सुरुच ठेवण्याचा निर्णय घेतला. अमित शहांनी मात्र पावसामुळे आपली सभाच रद्द केली. त्यामुळे या दोघांच्या सभांची आता सोशल मीडियावर तुलना होऊ लागली आहे.


हेही वाचा : पुन्हा एकदा पावसात पवारांची सभा

कर्जत-जामखेडमध्ये पवारांचं पावसात भाषण

अहमदनगरच्या कर्जत-जामखेडमध्ये आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शरद पवार आणि अमित शहा या दोघांच्या सभा होत्या. यावेळी दोन्ही पक्षांचे अध्यक्ष एकमेकांसमोर उभे ठाकणार की काय? अशी शक्यता निर्माण झाली होती. मात्र, शरद पवारांची सभा सकाळीच झाली. यावेळी देखील साताऱ्याच्या सभेप्रमाणेच पाऊस कोसळत होता. मात्र, शरद पवारांनी पावसातच भाषण सुरू ठेवलं. रोहीत पवार यांच्या प्रचारासाठी ही सभा आयोजित करण्यात आली होती.


हीच ती साताऱ्यातली सभा – ..आणि भर पावसात शरद पवारांनी केलं भाषण!

अमित शहांचा काढता पाय

दरम्यान, शरद पवारांच्या सभेनंतर दुपारी अमित शहांची सभा होती. मात्र, पाऊस पडत असल्यामुळे अमित शहांनी ही सभाच रद्द करून माघारी परतणं पसंत केलं. त्यामुळे जिथे शरद पवारांनी सभा घेतली, तिथे अमित शहांनी मात्र पावसाला पाहून काढता पाय घेतल्याची चर्चा कर्जत-जामखेडमध्ये रंगली होती. कर्जत-जामखेडमझून शरद पवार यांचे नातू रोहित पवार आणि भाजपकडून विद्यमान मंत्री राम शिंदे यांच्यामध्ये सरळ लढत होणार आहे.

First Published on: October 19, 2019 4:55 PM
Exit mobile version