भाजपची ३० ऑक्टोबरला विधीमंडळ नेता निवडीची बैठक

भाजपची ३० ऑक्टोबरला विधीमंडळ नेता निवडीची बैठक

Meeting of BJP legislative leader for selection of legislative leader on October 7

भाजपच्या नवनिर्वाचित निवडून आलेल्या १०५ आमदारांची ३० ऑक्टोबर रोजी बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत विधीमंडळ नेता निवडीवर चर्चा होणार आहे. विधीमंडळ नेतेपदी कोण असणार? यावर मंथन केले जाणार आहे. प्रत्येक पक्षात विधीमंडळ नेता निवडीची प्रक्रिया फार महत्त्वाची मानली जाते. सध्या सत्ता स्थापनेसाठी बोलणी सुरु असताना प्रत्येक पक्ष आपापली रणनिती ठरवत आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपला १०५ जागांवर विजय मिळाला आहे. या विजयासह भाजप महाराष्ट्रात सर्वाधिक बहुमतांनी जिंकून आलेला पक्ष ठरला आहे. मात्र, तरीही भाजपला सत्ता स्थापनेसाठी अजूनही ४० जागांची गरज आहे. दरम्यान, ३० ऑक्टोबरला भाजपच्या विधीमंडळ नेत्याची निवड होणार आहे.

हेही वाचा – शिवसेनेला हवे अडीच वर्ष मुख्यमंत्री पद, सत्तेतही समान वाटप

देवेंद्र फडणवीसच विधीमंडळ नेते होणार?

३० ऑक्टोबरला विधानभवनच्या विधीमंडळात भाजपच्या विधीमंडळ नेत्याची निवड होईल. भाजपच्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार पूर्णपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पार पडला. गेल्या पाच वर्षांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच पक्षाचे महाराष्ट्रातील मुख्य नेते म्हणून समोर आले आहेत. त्यामुळे ३० ऑक्टोबरला होणाऱ्या भाजपच्या विधीमंडळ नेता निवडीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

First Published on: October 26, 2019 3:57 PM
Exit mobile version