घरमहाराष्ट्र'अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद लिहून द्या, शिवसेनेची भाजपाला अट'

‘अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद लिहून द्या, शिवसेनेची भाजपाला अट’

Subscribe

विधानसभा निवडणुकीतील ५९ आमदारांच पाठबळ मिळाल्यानंतर शिवसेनेचे आता नक्की ठरले आहे. त्यामुळे ठरल्याप्रमाणे भाजप वागली नाही तर आमच्या समोर सर्व पर्याय खुले असतील असा सूचक इशारा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बैठकीत दिल्याचे समोर आले आहे.

विधानसभा निवडणुकीतील ५९ आमदारांच पाठबळ मिळाल्यानंतर शिवसेनेचे आता नक्की ठरले आहे. त्यामुळे ठरल्याप्रमाणे भाजप वागली नाही तर आमच्या समोर सर्व पर्याय खुले असतील असा सूचक इशारा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बैठकीत दिल्याचे समोर आले आहे. यावेळी कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्री पद हवे असून लिहून द्या, अशी अट शिवसेनेने भाजपाला घातली आहे. सत्तेमध्ये देखील मंत्री पदांचा समान वाटा हवा आहे. जोपर्यंत शिवसेनेच्या मुख्यमंत्री पदावर निर्णय होत नाही. तोपर्यंत पुढील चर्चा करायची नाही, अशी ठाम भूमिका शिवसेनेने घेतल्याचे खात्रीलायक समजते. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडून आलेल्या शिवसेनेच्या नवनिर्वाचीत आमदारांची शनिवारी दुपारी १२ वाजता ‘मातोश्री’वर बैठक बोलावली होती. ही बैठक उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली असून तब्बल १ तास बंद दाराआड चर्चा झाली आहे. तसेच या बैठकीत झालेली चर्चा ही सत्ता वाटपाच्या फॉर्म्युल्यावरुन झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच ‘आदित्य ठाकरे तुम्हीच मुख्यमंत्री व्हा’, असे विजयी आमदरांनी उद्धव ठाकरे यांना साकड देखील घातल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

भाजपची मनमानी यापुढे खपवून घेणार नाही

विधानसभा निवडणुकीचे निकाल लागताच शिवसेनेने ‘भाजपची मनमानी यापुढे खपवून घेणार नाही’, असा इशारा दिला होता. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने ऐन दिवाळीतही नेत्यांच्या आणि आमदारांच्या मातोश्रीवर बैठका सुरूच ठेवल्या आहेत. त्यामुळे आता जागा वाटपानंतर सत्ता वाटपाच्या फॉर्म्युल्यावर खलबतं सुरु असल्याचे दिसत असून शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले असून दिवाळीनंतर राज्यात राजकीय उलथापालथ होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. शिवसेनेचे निवडणून आलेले ५६ उमेदवार आणि तीन बंडखोर, असे मिळून ५९ आमदार चौदाव्या विधानसभेत शिवसेनेचे असतील. या सर्व आमदारांनी एक सुरात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्री पद भाजपाने दिलेचे पाहिजे, असा आग्रह धरला. तसेच सत्ता स्थापनेबाबत सर्वाधिकार उद्धव ठाकरे यांना देण्याबाबत ठरावही मंजूर करण्यात आला आहे. यावर काही आमदारांनी भाजपाकडून लेखी स्वरुपात सत्तेचा ५० – ५० वाटा आणि अडीच – अडीच वर्ष लेखी स्वरुपात घेण्याचे सांगितले असल्याचे समजते.

- Advertisement -

हेही वाचा – महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग; दोन अपक्ष आमदार पोहोचले मातोश्रीवर


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -