वाचा! का वाटतेय खासदार सुप्रिया सुळेंना कॅमेरामनची काळजी

वाचा! का वाटतेय खासदार सुप्रिया सुळेंना कॅमेरामनची काळजी

खासदार सुप्रिया सुळे

सध्या राज्यात दिवसरात्र राजकीय घडामोडी घडत आहेत. २४/७ या घडामोडींवर नजर ठेवणाऱ्या माध्यमांचीही चांगलीच दमछाक होत आहे. यातच ब्रेकींग आणि एक्सक्लुसिव्हच्या स्पर्धेत इलेक्ट्रॉनिक मीडिया जीवाच रान करताना दिसते. राजकीय मंडळींना गाठून त्यांच्याकडून सर्वात आधी बातमी मिळवण्याच्या नादात कॅमेरामनची चांगलीच तारांबळ उडते. अशा इलेक्ट्रॉनिक मीडियातील कॅमेरामन आणि ड्रायव्हरला खासदार सुप्रिया सुळे यांनी मोलाचा सल्ला दिला आहे. त्यांनी या कॅमेरामनला आपली काळजी घ्या, असे म्हटले आहे. तशा आशयाचे ट्विट सुप्रिया सुळे यांनी

केले आहे.

काय म्हणाल्या सुप्रियाताई 

माध्यमातील मित्र- मैत्रिणींनो, ब्रेकींग न्यूजचं महत्व मी अमान्य करीत नाही, पण रस्ते सुरक्षा देखील महत्वाची आहे. मला हा फोटो पाहून कॅमेरामन आणि ड्रायव्हरची काळजी वाटत आहे. सर्वांना आवाहन आहे की, आपली काळजी घ्या.

रोहित पवारची भावनिक पोस्ट 

दरम्यान, राज्यातील सत्तेचे समीकरण चार पक्षांमध्ये घडत असले तरी ते एका कुटुंबांच्या अवतीभवती फिरत आहे. ते कुटुंब म्हणजे पवार कुटुंब. एकीकडे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्यात सत्ता स्थापनेची खलबंत सुरु असतानाच दुसरीकडे राष्ट्रवादीतील एक बडे नेता, माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी भाजपसोबत हातमिळवणी केली. या राजकीय भूकंपामुळे सामान्यांसह पवार कुटुंबाच्या समर्थकांनाही धक्का बसला. शरद पवार यांनी वयाच्या ८० व्या वर्षी दाखवलेले खंबीर नेतृत्व आणि पक्ष बांधणी त्यांच्यातील कणखर नेत्याचे दर्शन घडवत असले, तरीही कुटुंब प्रमुख म्हणून त्यांना नक्कीच यातना झाल्या असतील. याबाबतची एक भावनिक पोस्ट शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार यांनी फेसबुकवर शेअर केली आहे.

हेही वाचा –

‘प्रश्न कौटुंबिक असो की राजकिय; खचून जाणं हे साहेबांच्या डिक्शनरीत नाही’

First Published on: November 24, 2019 3:49 PM
Exit mobile version