घरमहाराष्ट्र'प्रश्न कौटुंबिक असो की राजकिय; खचून जाणं हे साहेबांच्या डिक्शनरीत नाही'

‘प्रश्न कौटुंबिक असो की राजकिय; खचून जाणं हे साहेबांच्या डिक्शनरीत नाही’

Subscribe

राज्यातील सत्तेचे समीकरण चार पक्षांमध्ये घडत असले तरी ते एका कुटुंबांच्या अवतीभवती फिरत आहे. ते कुटुंब म्हणजे पवार कुटुंब. एकीकडे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्यात सत्ता स्थापनेची खलबंत सुरु असतानाच दुसरीकडे राष्ट्रवादीतील एक बडे नेता, माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी भाजपसोबत हातमिळवणी केली. या राजकीय भूकंपामुळे सामान्यांसह पवार कुटुंबाच्या समर्थकांनाही धक्का बसला. शरद पवार यांनी वयाच्या ८० व्या वर्षी दाखवलेले खंबीर नेतृत्व आणि पक्ष बांधणी त्यांच्यातील कणखर नेत्याचे दर्शन घडवत असले, तरीही कुटुंब प्रमुख म्हणून त्यांना नक्कीच यातना झाल्या असतील. याबाबतची एक भावनिक पोस्ट शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार यांनी फेसबुकवर शेअर केली आहे.

- Advertisement -

विधानसभा निवडणुकीत संपूर्ण राज्यातून पहिल्या क्रमांकाच्या विक्रमी मताधिक्याने निवडून आलेल्या अजित पवारांनी काल, शनिवारी नाट्यमयरित्या भाजपामध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर राज्यासह देशभरात भाजपची सर्जिकल स्ट्राइकची चर्चा झाली. अजित पवार यांच्यावर ही वेळ राजकीय आणि कौटुंबिक घुसमटीमुळे आली असल्याचे स्पष्ट झाले आहे. विधानसभा निवडणुकीत संपूर्ण राज्यातून पहिल्या क्रमांकाच्या विक्रमी मताधिक्याने निवडून आलेल्या अजित पवारांनी काल, शनिवारी नाट्यमयरित्या भाजपामध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर राज्यासह देशभरात भाजपची सर्जिकल स्ट्राइकची चर्चा झाली. अजित पवार यांच्यावर ही वेळ राजकीय आणि कौटुंबिक घुसमटीमुळे आली असल्याचे स्पष्ट झाले आहे. एकत्र कुटुंबामध्ये विश्वास ठेवणार्‍या पवार कुटुंबातील निर्णयांमध्येही थोरल्या पवारांचा शब्दच आजही प्रमाण मानला जात असल्यामुळे अजितदादांचे फारसं काही चालत नव्हते. त्यामुळे कुटुंबातही त्यांची चिडचिड होत होती. थोरल्या पवारांवर राष्ट्रीय राजकारणामध्ये शब्द फिरवणारे किंवा ऐनवेळी टांग मारणारे नेते म्हणून अनेक राष्ट्रीय नेत्यांकडून ठपका ठेवण्यात आलेला आहे. आता वयाच्या ८० व्या वर्षी आपल्यावरचा हा ठपका कायम होऊ नये, यासाठी पवारांनी हाती घेतलेला महाविकासआघाडीचा कार्यक्रम पैलतीराला लावण्याचा चंग थोरल्या पवारांनी बांधला होता. त्यासाठी त्यांनी अजित पवारांना न आवडणार्‍या शिवसेनेच्या संजय राऊत यांच्याबरोबर बोलणी सुरू केली होती. मात्र अजित पवार यांच्या भाजपच्या वळचणीला जाण्याने पुन्हा एकदा पवारांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -