राज ठाकरेंची पहिल्या सभेत मागणी, ‘मला सत्ता नको, विरोधी पक्षाची धुरा द्या’!

राज ठाकरेंची पहिल्या सभेत मागणी, ‘मला सत्ता नको, विरोधी पक्षाची धुरा द्या’!
पुण्यातली सभा रद्द झाल्यानंतर अखेर मुंबईत राज ठाकरें पहिली प्रचारसभा झाली. वांद्रे पूर्वमध्ये झालेल्या या पहिल्याच प्रचारसभेमध्ये राज ठाकरेंनी अवघ्या १७ मिनिटांमध्ये आपलं भाषण आटोपतं घेतलं. त्यांचं हे कदाचित सर्वात छोटं भाषण असल्याचं बोललं जात आहे. या भाषणामध्ये त्यांनी कोणताही व्हिडिओ लावला नाही किंवा सत्ताधारी आणि विरोधकांवर शेलक्या शब्दांमध्ये टीका देखील केली नाही. त्यामुळे काही प्रमाणात स्थानिक मनसे कार्यकर्त्यांचं आणि मतदारांचा हिरमोड झाल्याचं पाहायला मिळालं. ‘या विधानसभेच्या निवडणुकांसाठी मी भूमिका घेतोय. पुढच्या काही दिवसांमध्ये माझ्या १८ ते १९ सभा आहेत. या विधानसभेला मी तुमच्यासमोर एक मागणं घालायला आलो आहे. ते म्हणजे, या राज्याला सर्वार्थाने ज्याची गरज आहे, ती एका कणखर, सक्षम विरोधी पक्षाची गरज आहे. सत्तेतला आमदार काही करू शकत नाही. विरोधी पक्षातला आमदार तुमच्या मनातली खदखद मांडू शकतो. विरोधी पक्षाचा नेता, आमदार आश्वासनांचा जाब विचारू शकतो. तो या सरकारला नामोहरम करू शकतो. जेव्हा माझ्या आवाक्यात सत्ता असेल, तेव्हा मी सत्तेसाठी तुमच्याकडे येईन. पण आज मी तुमच्याकडे विरोधी पक्षासाठी तुमच्याकडे आलोय. अशी कुणी मागणी केली असेल, असं मला वाटत नाही. म्हणून आज राज्याच्या नागरिकांची गरज आहे ती सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणाऱ्यांची आहे. सत्ताधाऱ्यांच्या अंगावर जाणाऱ्यांची आहे’, असं यावेळी राज ठाकरे म्हणाले.
गोरेगाव सभेत राज ठाकरे म्हणतात, ‘ब्लू फिल्म काढली असती, तर लोकांनी पाहिली तरी असती’

वाचा राज ठाकरेंच्या १७ मिनिटांच्या भाषणातील सर्व मुद्दे!
Pravin Wadnere

राज ठाकरेंनी अवघ्या १७ मिनिटांमध्ये आपली पहिली प्रचारसभा संपवली. त्यामध्ये कोणताही व्हिडिओ न दाखवता त्यांनी भाषण आटोपतं घेतलं. इतक्या कमी वेळात संपलेलं त्यांचं हे सर्वात कमी वेळाचं भाषण आहे.

Pravin Wadnere

इथले उमेदवार अखिल चित्रे हे उगाच बुटाला पॉलिश करून आणि एवढीशी दाढी वाढवून फिरत नाहीत. ते तरूण आहेत. त्यांच्यात तडफ आहे या सरकारला जाब विचारण्याची. – राज ठाकरे

Pravin Wadnere

कुणीतरी उठतं आणि आमच्या सणांवर बंदी आणतं. दहीहंडी करू नका, गणपतीत आवाज करू नका, फटाके फोडू नका. आणि हे सगळं महाराष्ट्रात होतं. ज्या ज्या वेळी अशी बंदी आली, मनसेनं आवाज उठवला आहे आणि सण साजरे झाले आहेत. – राज ठाकरे

Pravin Wadnere

या विधानसभेच्या निवडणुकांसाठी मी भूमिका घेतोय. पुढच्या काही दिवसांमध्ये माझ्या १८ ते १९ सभा आहेत. या विधानसभेला मी तुमच्यासमोर एक मागणं घालायला आलो आहे. ते म्हणजे, या राज्याला सर्वार्थाने ज्याची गरज आहे, ती एका कणखर, सक्षम विरोधी पक्षाची गरज आहे. सत्तेतला आमदार काही करू शकत नाही. विरोधी पक्षातला आमदार तुमच्या मनातली खदखद मांडू शकतो. विरोधी पक्षाचा नेता, आमदार आश्वासनांचा जाब विचारू शकतो. तो या सरकारला नामोहरम करू शकतो. जेव्हा माझ्या आवाक्यात सत्ता असेल, तेव्हा मी सत्तेसाठी तुमच्याकडे येईन. पण आज मी तुमच्याकडे विरोधी पक्षासाठी तुमच्याकडे आलोय. अशी कुणी मागणी केली असेल, असं मला वाटत नाही. म्हणून आज राज्याच्या नागरिकांची गरज आहे ती सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणाऱ्यांची आहे. सत्ताधाऱ्यांच्या अंगावर जाणाऱ्यांची आहे. – राज ठाकरे

Pravin Wadnere

तरूणांना नोकऱ्या लावण्याची आश्वासनं दिली होती, त्याचं काय झालं. रोजगार असणाऱ्याचा रोजगार जातोय, बेरोजगारांना रोजगार मिळत नाही. हे पुढारलेलं महाराष्ट्र राज्य अधोगतीला जात आहे. – राज ठाकरे

First Published on: October 10, 2019 7:32 PM
Exit mobile version