गडचिरोली : निवडणुक कर्तव्यावर असताना शिक्षकाचा मृत्यू

गडचिरोली : निवडणुक कर्तव्यावर असताना शिक्षकाचा मृत्यू

रुग्णालयातील लिफ्टने घेतला महिला कर्मचाऱ्याचा बळी

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी राज्यातल्या एकूण २८८ मतदारसंघांमध्ये मतदान होत असून या विधानसभा निवणुकीला गालबोट लागल्याचे समोर आले आहे. गडचिरोलीमध्ये निवडणुकेचे कर्तव्य बजावताना एका शिक्षकांचा मृत्यू झाला आहे. अचानक त्यांना भोवळ आली आणि ते खाली कोसळले. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे.

नेमके काय घडले?

गडचिरोलीमधील एटापल्ली तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक बापू पांडु गावडे (४५) हे निवडणुक कर्तव्य बजावत असताना भोवळ येऊन ते खाली कोसळले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तात्काळ चंद्रपूर येथे उपचाराकरता दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. बापू गावडे यांना मिरगीचा आजार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांची विधानसभा निवडणूकींसाठी एटापल्ली तालुक्यातील पुरसलगोंदी येथील बुथवर ड्यूटी लावण्यात आली होती. ते मतदान केंद्र पथक हेडरी बेस कॅम्पवरुन पुसलगोंदी केंद्राकडे पायी जात असताना गावडे यांना भोवळ आणि त्याच त्यांचा मृत्यू झाला आहे.


हेही वाचा – दिग्गजांनी बजावला मतदानाचा हक्क


 

First Published on: October 21, 2019 1:34 PM
Exit mobile version