ठाकरे सरकारने जिंकला बहुमत प्रस्ताव; १६९ आमदारांचे समर्थन

ठाकरे सरकारने जिंकला बहुमत प्रस्ताव; १६९ आमदारांचे समर्थन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या ‘महाराष्ट्रविकास’आघाडीने विधानसभेत आपले बहुमत सिद्ध करत १६९ आमदारांनी ठरावाच्या बाजुने मतदान केले तर चार आमदार तटस्थ राहिले. त्यामुळे महाविकास आघाडीने बहुमताचा प्रस्ताव १६९ मत विरोधात भाजपाने सभा त्याग केल्याने विरोधात शून्य मते पडली. त्यामुळे मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांच्या सरकारने १६९ मतांनी हा प्रस्ताव जिंकला आहे.

 

राज्याच्या विधानसभेत एकूण २८८ आमदार असून सरकारच्या बाजून १६९ जणांनी तर चार जण तटस्थ राहिल्याने विदानसभेत १७३ आमदार उपस्थित होते. तर दुसरीकडे भाजपाचे १०५ आणि १० सहयोगी अपक्ष असे मिळून भाजपच्यासोबत ११५ आमदार असल्याचे सिद्ध झाले.

उद्धव ठाकरेंने जिंकला विश्वासदर्शक ठराव

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राज्यात मोठ्या घडामोडी होण्यास सुरुवात झाली. या राजकीय घडामोडीनंतर राज्यात सत्तेवर आलेल्या शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महाविकास आघाडीच्या सरकारने बहुमताच्या परीक्षेचा निर्णायक अडथळा आज यशस्वीरित्या पार केला आहे. नवे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सरकारवरील विश्वास ठराव सहज जिंकला आहे.

‘हे’ आमदार राहिले तटस्थ

आवाजी मतदान घेऊन शिरगणतीद्वारे घेण्यात आले मतदान

राज्यात महाविकास आघाडी अस्तित्वात येण्याआधी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बहुमताच्या परीक्षेला सामोरे जाण्याआधीच राज्यपालांकडे राजीनामा दिला. त्यानंतर ‘महाविकास’ आघाडीने सत्तास्थापनेचा दावा केला. त्यानंतर राज्यात अनेक घडामोडी घडण्यास सुरुवात झाली. त्यानंतर पुढील सर्व सोपस्कार पार पडले आणि नव्या सरकारचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली. राज्यपालांच्या सूचनेनुसार बहुमत सिद्ध करण्यासाठी दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले होते.

त्यानुसार सभागृह सुरू झाल्यानंतर सुरुवातीचे कामकाज आटोपल्यानंतर काँग्रेसचे सदस्य अशोक चव्हाण यांनी उद्धव ठाकरे सरकारवरील विश्वासाचा प्रस्ताव मांडला. त्यांना सत्ताधारी बाकावरील राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक, राष्ट्रवादीचे जयंत पाटील आणि शिवसेनेचे सुनील प्रभू यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर आवाजी मतदान घेऊन शिरगणतीद्वारे मतदान घेण्यात आले. मतदान सुरू होताच भाजपच्या सदस्यांनी सभात्याग केला. त्यानंतर अध्यक्षांच्या सूचनेनुसार सभागृहाचे दरवाजे बंद करून गणती करण्यात आली आणि विश्वास ठरावाच्या बाजूने १६९ मते पडली आणि हा ठराव उद्धव ठाकरे सरकारने जिंकला आहे.


हेही वाचा – नव्या सरकारच्या शपथविधीला भाजपचा आक्षेप


First Published on: November 30, 2019 3:04 PM
Exit mobile version