अब आयेगा मजा – नितेश राणे

अब आयेगा मजा – नितेश राणे

आधी भाजप, नंतर शिवसेना आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसला देखील सत्तास्थापनेत अपयश आल्यानंतर अखेर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. यावर नितेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून महाशिव आघाडीला अप्रत्यक्षरित्या टोला लगावला आहे. ‘अब आयेगा मजा’, असे ट्विट नितेश राणेंनी केले असून महाशिव आघाडीच्या अनेक बैठका झाल्या पण अजून तोडगा निघालेला दिसत नसल्याने त्यांनी ट्विटरद्वारे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

आघाडी शिवसेनेला उल्लू बनवतंय

नारायण राणे आणि शिवसेना वाद काही नवा नाही मात्र, आता सत्ता स्थापनेमध्ये राज्यपालाकडे बहुमत सिद्ध न करू शकलेल्या शिवसेनेवर नारायण राणे यांनी टीका केली आहे. काँग्रेसचे नेते समोर काय बोलतात पाठी मागे काय बोलतात हे उद्धव ठाकरे यांना समजले पाहिजे, असे म्हणत काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेनेला उल्लू बनवायचे काम करायत आहे अशी टीका नारायण राणे यांनी माध्यमाशी बोलताना केली. वर्षां येथे भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली यावेळी नारायण राणे हे देखील उपस्थित होते.

राष्ट्रपती राजवटीला शिवसेना जबाबदार

राज्यात लागू झालेल्या राष्ट्रपती राजवटीला शिवसेना जबाबदार असल्याची टीका नारायण राणे यांनी करत, निवडणुकी आधी युती झाली हे नैतिकतेला धरून नसल्याची टीका केली. एवढच नाही तर सत्ता स्थापनेला विलंब होतो हे योग्य नसल्याचे सांगत जनतेची ज्यांना काळजी आहे, असे शिवसेना सांगत आहे पण यांच्यामुळे विलंब होत असल्याची टीका देखील त्यांनी यावेळी केली आहे.


हेही वाचा – ‘…तर शिवसेनेचं स्वागतच’, भाजपची नवी खेळी!


First Published on: November 12, 2019 10:30 PM
Exit mobile version