‘हे’ दोन आमदार सर्वांत गरीब

‘हे’ दोन आमदार सर्वांत गरीब

आमदार विनोद निकोले आणि श्रीनिवास वनगान

विधानसभा मतदारसंघांतून उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र सादर केले आहेत. मात्र यापैकी अनेक उमेदवार हे अब्जाधिश आणि कोट्याधीश असल्याचे समोर आले आले असले तरी मात्र, याला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणू विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार विनोद भिवा निकोले हे अपवाद आहेत. आमदार विनोद निकोले सर्वांत कमी श्रीमंत असल्याचे त्यांच्या प्रतिज्ञापत्रावर दिसून येत आहे. तर शिवसेनेत मात्र सर्वांत गरीब आमदार पालघर विधानसभा मतदारसंघाचे श्रीनिवास वनगा ठरले असल्याचे वृत्त ‘दैनिक पुढारी’ या वृत्तातून देण्यात आले आहे.

विनोद निकोले यांच्याकडे राहण्यासाठी स्वत:च्या मालकीचे घरही नसून त्यांच्याकडे ५१ हजार ८२ रुपयांची रोकड असल्याचे समोर आले आहे. तर श्रीनिवास वनगा यांच्याकडे ९ लाख ७० हजार २३० वारस प्राप्त मालमत्ता मिळून ३४ लाख ६० हजार ३३३ इतकी आहे. विशेष म्हणजे या दोन्ही उमेदवारांवर कोणत्याही प्रकारचा गुन्हा नसून स्वच्छ चारित्र्याचे असल्याचे समोर आले आहे.

वनगा यांची मालमत्ता

वनगा यांच्याकडे बँकेचे ११ लाख २१ हजार ३८५ इतके कर्ज असून त्यात चारचाकी (१) ६ लाख ८५ हजार ४९८, सोने चांदी बाजार मूल्यानुसार २० ग्रॅम ७२ हजार तर वनगा यांच्या पत्नीकडे ३० ग्रॅम बाजारमूल्य १ लाख ८ हजारप्रमाणे सुमन यांची जंगम मालमत्ता ८ लाख ४६ हजार १२३ रुपये आहे. त्यात स्थावर मालमत्ता २ लाख ९ हजार इतकी असून त्यात सुमन यांचे बँक आणि वित्तीय कर्ज ११ लाख ५७ हजार ३१४ रुपये असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे. तसेच पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील हे दोन्ही आमदार गरीब असून त्यांच्यावर मतदारांनी विश्वास ठेवला आहे.


हेही वाचा – शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाचे आश्वासन कधीच दिले नव्हते


 

First Published on: October 30, 2019 11:17 AM
Exit mobile version