सध्या आंब्याचा सिजन सुरु आहे. या दिवसात आपण अनेकदा आंब्याचा आमरस, मिल्क शेक आवडीने बवनतो. पण आज आम्ही तुम्हाला मँगो-केसर लस्सी कशी बनवायची हे सांगणार आहोत.
साहित्य :
- 200 मिली दही
- 1 कप आंब्याचा रस
- 3-4 कप दूध
- 12-15 केसर काड्या ( दुधात भिजवून )
- 6 चमचे साखर
- 2 चिमुट वेलची पूड
- बदाम, पिस्त्याची भरड सजावटीसाठी
कृती :
- Advertisement -
- सर्वात आधी आंब्याचा रस मिक्सरमधून फिरवून घ्या.
- त्याच मिक्सरच्या भांड्यात दही, दूध,साखर, केसर व वेलची पूड घालून सर्व साहित्य एकजीव होईपर्यंत फिरवून घ्या.
- त्यानंतर तयार मँगो-केसर लस्सी फ्रीजमध्ये थंड करण्यास ठेवावी.
- गार झाल्यानंतर त्यावर बदाम, पिस्ता देखील टाकून सजवा आणि सर्व्ह करा.