Wednesday, May 1, 2024
घरमानिनीReligiousश्रीरामांचे 'हे' 3 सोपे मंत्र आहेत खूप प्रभावी; जप करताच होते इच्छापूर्ती

श्रीरामांचे ‘हे’ 3 सोपे मंत्र आहेत खूप प्रभावी; जप करताच होते इच्छापूर्ती

Subscribe

हिंदू धर्मात देवी-देवातांच्या नियमित पूजेसोबतच त्यांच्या मंत्राचं आणि स्तोत्रांचं पठण करणं महत्त्वपूर्ण मानलं जातं. देशाभरात श्री रामांचे देखील अनेक भक्त आहेत. शास्त्रानुसार, श्री राम असे दैवत आहेत ज्यांचे स्मरण साक्षात श्री हनुमान आणि महादेव देखील करतात. असं म्हणतात, श्री रामांचा नाम जप केल्याने व्यक्तीला शारीरिक आणि मानसिक शक्ती प्राप्त होते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला श्रीरामांचे 3 सोप्पे मंत्र सांगणार आहोत. ज्याचा जप तुम्ही नियमित करू शकता.

Ram Mantra: मंत्र का अर्थ और लाभ

- Advertisement -
  • राम मंत्र

ॐ रां रामाय नमः

रामाच्या या मंत्राचा जप केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. व्यक्तीवर रामाची कृपा होते.

- Advertisement -
  • राम गायत्री मंत्र

ॐ दाशरथये विद्महे सीतावल्लभाय धीमहि, तन्नो राम प्रचोदयात्॥

या मंत्राचा नियमित जप केल्याने व्यक्तीला मानसिक शांती प्राप्त होते. तसेच त्याला श्रीरामांचे गुण प्राप्त होताता. व्यक्तीच्या मनातील मोह, काम, क्रोध, लोभ, मत्सर, माया, अहंकार नाहीसा होतो.

  • श्री राम तारक मंत्र

राम रामेति रामेति, रमे रामे मनोरमे ।
सहस्रनाम तत्तुल्यं, रामनाम वरानने ॥

हा रामाचा सर्वात प्रिय मंत्र असून याचा जप केल्याने व्यक्तीला पुण्य प्राप्ती होते. असं म्हणतात, या मंत्राचा जप केल्याने श्री विष्णूसहस्त्रनामाचे पुण्य लाभते.

जप कसा करावा

  • धार्मिक ग्रंथानुसार सकाळी किंवा संध्याकाळी जप करणं उत्तम मानले जातं.
  • घरातील स्वच्छ ठिकाणी बसून समोर धूप, दिप लावून या मंत्राचे पठण करावे.
  • जप करताना कोणताही वाईट, नकारात्मक विचार मनात आणू नये. जप करताना मग एकाग्र करावे.

हेही वाचा : श्रीरामांना प्रसन्न करण्यासाठी करा रामरक्षा स्तोत्राचे पठण; आहेत अनेक फायदे

- Advertisment -

Manini