घरदेश-विदेशMamata Banerjee : पश्चिम बंगालमध्ये स्वबळावर लढणार; मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची मोठी घोषणा

Mamata Banerjee : पश्चिम बंगालमध्ये स्वबळावर लढणार; मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची मोठी घोषणा

Subscribe

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणूक पश्चिम बंगालमध्ये स्वबळावर लढणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली. ही माहिती विविध खासगी वृत्तसंस्थानी दिली असून, त्यामुळे आता इंडिया आघाडीत उभी फूट पडल्याची चर्चा सध्या रंगत आहे. (Big Breaking Will fight on his own in West Bengal Chief Minister Mamata Banerjees big announcement)

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी खासगी वृत्तसंस्थांना देताना म्हणाल्या की, माझी काँग्रेस पक्षाशी कोणतीही चर्चा झाली नाही. बंगालमध्ये आम्ही एकटेच लढू, असे मी नेहमीच सांगत आले आहे. देशात काय होईल याची मला चिंता नाही, पण आम्ही धर्मनिरपेक्ष पक्षाचे प्रतिनिधीत्व करतो. बंगालमध्ये आम्ही भाजपचा एकट्यानेच पराभव करू. मी इंडिया आघाडीचा एक भाग आहे. राहुल गांधींची न्याय यात्रा आमच्या राज्यातून जात आहे, पण आम्हाला त्याची माहिती देण्यात आलेली नाही असाही गौप्यस्फोट त्यांनी केला.

- Advertisement -

चर्चा फिस्कटल्याने निर्णय

काँग्रेससोबतची चर्चा निष्फळ ठरल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंती ममत बॅनर्जी यांचे म्हणणे आहे. त्या म्हणाल्या की, मी त्यांना (काँग्रेस) जी काही ऑफर दिली, ती त्यांनी नाकारली. त्यामुळेच यानंतरच मी बंगालला एकट्याने जाण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसने राज्यात टीएमसीकडे 10-12 जागांची मागणी केल्याचे वृत्त होते.

हेही वाचा : IND vs ENG Test Series: विराट कोहली संघाबाहेर; आता इंग्लंडविरुद्ध खेळणार ‘हा’ धडाकेबाज फलंदाज

- Advertisement -

काय म्हणाल्या ममता बॅनर्जी?

ममता बॅनर्जी म्हणाल्या की, मी आघाडीचे नाव ‘इंडियन नॅशनल डेमोक्रेटिक इन्क्लुझिव्ह अलायन्स’ (इंडिया) सुचवले होते, पण जेव्हा मी बैठकीला गेले, तेव्हा मला दिसले की, डावे पक्ष त्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या पुढे म्हणाल्या की, सत्तेत असल्याने मी भाजपशी लढत आहे, पण काही लोकांना जागावाटपावरून आमचे ऐकायचे नसल्याचीही माहिती त्यांनी दिली.

ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी (19 जानेवारी) मुर्शिदाबाद जिल्ह्यातील पक्षाच्या नेत्यांच्या बैठकीत सांगितले की, इंडिया आघाडीमध्ये पक्षाला योग्य महत्त्व न दिल्यास TMC लोकसभेच्या सर्व 42 जागांवर स्वतंत्रपणे निवडणूक लढवेन. यासाठी पक्ष पूर्णपणे तयार असल्याचेही त्या म्हणाल्या.

हेही वाचा : Mumbai-Pune Weather Update : मुंबईसह पुणेही गारठले; दोन्ही महानगरांचं तापमान 15 अंशाखाली

ममता बॅनर्जींच्या निर्णयावर आरजेडीची प्रतिक्रिया

पश्चिम बंगालमध्ये आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री ममत बॅनर्जी यांनी केल्यानंतर आता आरजेडीकून प्रतिक्रिया समोर आली आहे. आरजेडीचे खासदार मनोज झा यांनी प्रतिक्रिया दिली की,कृपया काही वेळ प्रतीक्षा करा, कदाचित विधान काही विशिष्ट परिस्थितीत दिले गेले असेल. जर इंडिया आघाडीमध्ये काही संघर्ष झाला असेल तर आघाडीतील नेते तो संघर्ष सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -