Hindu Shastra : गरूड पुराणानुसार व्यक्तीच्या ‘या’ वाईट सवयींमुळे तो होऊ शकतो कंगाल

गरूड पुराणाला महापुराणाचा दर्जा देण्यात आला आहे. यामध्ये जीवन-मृत्यू शिवाय सुखी आणि सफल आयुष्य मिळवण्यासाठीचे काही उपाय देखील सांगण्यात आले आहेत

हिंदू शास्त्रात एकूण १८ मुख्य पुराणांचा उल्लेख केलेला आहे, त्यापैकी गरूड पुराणाला महापुराणाचा दर्जा देण्यात आला आहे. यामध्ये जीवन-मृत्यू शिवाय सुखी आणि सफल आयुष्य मिळवण्यासाठीचे काही उपाय देखील सांगण्यात आले आहेत. तसेच कोणत्या गोष्टी केल्याने तुमचे नुकसान होऊ शकते.याबाबतही काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत.

गरूड पुराणानुसार या ५ चुका कधीही करू नका

१. सूर्योदयानंतर उठणारे लोक
घरातील वडीलधारी माणसं सकाळी लवकर उठावं असं नेहमीच सांगत असतात. याचे वर्णन गरूड पुराणातही करण्यात आले आहे. सकाळी उशीरा उठणार व्यक्ती आयुष्यात कधीही यशस्वी होत नाही. त्याला आयुष्यभर अनेक आर्थिक संकटांचा सामना करावा लागू शकतो. सकाळी उशीरा उठणाऱ्या व्यक्तींवर देवी लक्ष्मी नाराज होतात.

२. मेहनत करण्याची इच्छा नसणारे लोक
काही लोकांना कष्ट, मेहनत करण्याची अजिबात इच्छा नसते. त्यांना सांगितलेले प्रत्येक काम टाळतात. तसेच हे लोक खूप आळशी देखील असतात. अशा व्यक्तींमध्ये कतृत्व करण्याची इच्छा आणि क्षमता नसते. त्यामुळे असे लोक आयुष्यात कधीही सफल होत नाहीत.

३. खराब कपडे परिधान करणारे लोक
नेहमी अस्वच्छ आणि वाईट अवस्थेतील कपडे घालणाऱ्या लोकांवर देवी लक्ष्मी नाराज असतात. तसेच जे लोक दररोज अंघोळ करत नाहीत, स्वतःच्या स्वच्छतेची काळजी घेत नाहीत. अशा लोकांना अनेक आर्थिक समस्या निर्माण होतात.

४.दुसऱ्यांचा अपमान करणारे लोक
गरूड पुराणामध्ये जे लोक सतत इतरांचा अपमान करतात, शिवाय एखाद्याची बदनामी करतात. तसेच ज्यांच्यामध्ये अहंकार आणि क्रोध असतो. असे लोक कधीही सफल होत नाहीत.

५. घर अस्वच्छ ठेवणारे लोक
गरूड पुराणामध्ये ज्या व्यक्तींच्या घरामध्ये कधीही स्वच्छता नसते. अशा ठिकाणी देवा लक्ष्मी कधीही वास करत नाहीत.

 


हेही वाचा :Lucky Finger : अशी बोटं असणाऱ्या मुली असतात आपल्या पार्टनरसाठी लकी