घरदेश-विदेशSeema Haider : आठवले थेटच बोलले; सीमाला निवडणुकीचे नव्हे तर भारतातून पाकिस्ताचे...

Seema Haider : आठवले थेटच बोलले; सीमाला निवडणुकीचे नव्हे तर भारतातून पाकिस्ताचे तिकीट मिळेल

Subscribe

पब्जी गेमच्या माध्यमातून थेट पाकिस्तानची सीमा ओलांडून बेकायदेशीररित्या भारतात आलेल्या सीमा हैदरला आरपीआय आठवले गटाकडून निवडणुकीची ऑफर दिली जाणार असल्याची चर्चा रंगत होती.

नवी दिल्ली : या ना त्या कारणाने चर्चेत राहत असलेल्या सीमा हैदरला (Seena Haider) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) या पक्षाकडून निवडणुकीचे तिकीट दिले जाणार असल्याची चर्चा सर्वत्र रंगत असताना आता या चर्चेला थेट केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी बोलून पूर्णविराम दिला आहे. निवडणुकीचे तिकीट नव्हे तर त्यांना थेट भारतातून पाकिस्तानाचे ( India To Pakistan) तिकीट दिले जाणार असल्याचे ते म्हणाले.

पब्जी गेमच्या माध्यमातून थेट पाकिस्तानची सीमा ओलांडून बेकायदेशीररित्या भारतात आलेल्या सीमा हैदरला आरपीआय आठवले गटाकडून निवडणुकीची ऑफर दिली जाणार असल्याची चर्चा रंगत होती. एवढेच नव्हे तर त्या महिला विंगच्या अध्यक्षसुद्धा होऊ शकतात अशीही चर्चा रंगत होती. मात्र या चर्चेला आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पूर्णविराम दिला आहे.

- Advertisement -

काय म्हणाले आठवले?वाचा-

पाकिस्तानी नागरिक असलेल्या सीमा हैदरबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले की, आमच्या पक्षाचा सीमा हैदरशी कोणताही संबंध नाही. त्या पाकिस्तानातून भारतात आल्या आहेत. त्यांचा पक्षात समावेश करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आणि जर त्यांना तिकीट द्यायचेच असेल तर ते भारतातून पाकिस्तानचे तिकीट असणार आहे असे वक्तव्य करीत आठवले चर्चेला पूर्णविराम दिला आहे.

हेही वाचा : इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; इमर्जन्सी लँडिंग, सर्व प्रवासी सुखरूप

- Advertisement -

आतापर्यंत सीमाला ह्या मिळाल्या ऑफर

पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरला आतापर्यंत वेगवेगळ्या ऑफर मिळाल्या आहेत. यामध्ये चित्रपटात काम करण्याच्या काही ऑफर मिळाल्या आहेत. याशिवाय गुजरातमधील उद्योजकाने तिला नोकरीची ऑफर दिल्याची चर्चा आहे.

हेही वाचा : औरंगजेबाचे पोस्टर्स हा काही योगायोग नाही, हा प्रयोग आहे; फडणवीसांचे विरोधकांवर शरसंधान

सीमा तपास यंत्रणांच्या रडारवर

भारतात आलेली सीमा हैदरची सध्या तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू आहे. तपास यंत्रणांकडून तिची चौकशी पूर्ण झाल्यानंतर तिला भारतीय नागरिकत्व मिळण्याचे मार्ग मोकळा होणार आहे. मात्र, अद्याप तरी यामध्ये कुठलीही अपडेट नसून, तिची चौकशी सुरू आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -