Monday, May 6, 2024
घरमानिनीया सवयींमुळे होऊ शकतो पोटातील अल्सर

या सवयींमुळे होऊ शकतो पोटातील अल्सर

Subscribe

जिभेचे चोचले पुरविण्यासाठी आपण आवडीचे पदार्थ आरोग्याचा काहीही न विचार करता खातो. पण, खाण्यापिण्याच्या याचा अनेक चुकीच्या सवयी आजारांना आमंत्रण देणाऱ्या ठरू शकतात. खरं तर, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी पोटाच्या समस्येसाठी मोठ्या प्रमाणात जबाबदार असतात. खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे अपचन आणि गॅससारखा त्रास सुरु होतो. परिणामी, या समस्यांमुळे पोटातील अल्सर होऊ शकतो. त्यामुळे अशा सवयींवर वेळीच नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.

पोटातली अल्सर म्हणजे पोटातील जखम, जी पोटात किंवा लहान आतड्यात होते. ही जखम पोटातील आम्ल व्यतिरिक्त बॅक्टरीयाच्या संसर्गामुळे आणि नॉनस्ट्रेरॉईड अँटी- एम्फ्लेमेंटरी ड्रग्सच्या दुष्परिणामांमुळे होऊ शकते. अल्सरमध्ये पोटातील आम्ल किंवा बॅक्टरियाच्या संसर्गामुळे पोटातील संरक्षक थर कमकुवत होतो. अशा वेळी पोटात जखम तयार होते. तज्ज्ञांच्या मते, खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे पचनाच्या समस्या उदभवतात. या सवयींमुळे पोटात अल्सर होऊ शकतो.

- Advertisement -

पोटातील अल्सर टाळण्यासाठी पुढील सवयी सोडा

चटपटीत आणि मसालेदार पदार्थ

अनेकजणांचा चटपटीत आणि मसालेदार पदार्थ खाण्याकडे अधिक कल असतो. पण, हे पदार्थ पोटातील अल्सर होण्याचे कारण बनतात. तिखट- मसालेदार पदार्थांमुळे कैप्साइसिन नावाचे घटक असतो, जो पोटातील ऍसिड वाढविण्यास मदत करतो. त्यामुळे ज्या लोकांना पोटाच्या तक्रारी असतील त्यांनी असे पदार्थ खाणे टाळावे.

वेळेवर न जेवणे 

आजकाल लोकांचे आयुष्य खूप व्यस्त झाले आहे. ना त्याच्याकडे स्वतःसाठी वेळ ना वेळेत जेवणासाठी. मात्र, अशा सवयींमुळे शरीरावर याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. जास्त वेळ उपाशी राहिल्याने किंवा जेवणात अंतर ठेवल्याने पोटात ऍसिड तयार होते आणि ऍसिडचे प्रमाण पोटात वाढल्यास अल्सर होऊ शकतो.

- Advertisement -

अल्कोहोलचे सेवन

अल्कोहोलचे सेवन पोटातील अल्सर होण्याचे कारण बनू शकते. वास्तविक, अल्कोहोलच्या अतिसेवनाने पोटात गॅस्ट्रिक ऍसिड तयार होतो. परिणामी, तुम्हाला पोटातली अल्सर होण्याची शक्यता अधिक दृढ होते. त्यामुळे पोटातील अल्सर टाळण्यासाठी, अल्कोहोलच्या सेवनापासून दूर राहावे.

मानसिक तणाव 

मानसिक तणावामुळे इतर शारीरिक समस्यांसह पोटाचा अल्सर होण्याचा धोका वाढतो. तणावामुळे शरीरात कॉर्टिसॉल नावाचा हार्मोनचे उत्पादन वाढते. या हार्मोन्सचा पचन आणि पोटाच्या आवरणावर परिणाम होतो. म्हणून, पोटातील अल्सर टाळण्यासाठी तणाव कमी करण्याचा प्रयन्त करा.

 

 

 


हेही पहा : Mango And Diabetes : आंब्यामुळे डायबिटीस होतो ?

Edited By – Chaitali Shinde

 

- Advertisment -

Manini