गणपती बाप्पाला अर्पण करा हे नैवेद्य , होतील मनोकामना पूर्ण

गणपती बाप्पाला अर्पण करा हे नैवेद्य , होतील मनोकामना पूर्ण

प्रातिनिधिक चित्र

गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले आहेत. ३१ ऑगस्टला बाप्पाचे आगमन होणार असल्याने सध्या सगळीकडे बाप्पाच्या स्वागताची लगबग सुरू आहे. तसेच बाप्पाला गोड आवडत असल्याने त्याच्या या दहा दिवसाच्या मुक्कामी त्याला दहा प्रकारचे नैवेद्य अर्पण केले जातात. यात प्रामुख्याने गणपतीला आवडणाऱ्या गोडधोड पदार्थांचा समावेश असतो. गणपतीला त्याचा आवडता नैवेद्य अपर्ण केल्यास तो प्रसन्न होतो आणि भक्ताच्या मनोकामना पूर्ण करतो अशी भाविकांची श्रद्धा आहे. यामुळे हा गोड नैवेद्य कोणता ते बघूया.

गणपती ही विद्येची देवता असून मोदक त्याला प्रिय आहे. यामुळे गणेशोत्सवात बाप्पाला विविध प्रकारच्या मोदकांचा नैवेद्य अर्पण केला जातो. पण बाप्पाच्या आगमनानंतर पहील्या दिवशी त्याला मोदकांचा नैवेद्य दाखवावा. तर दुसऱ्या दिवशी मोतीचूरच्या लाडवांचा नैवेद्य अपर्ण करावा.

तर तिसऱ्या दिवशी एकदंत दयावंत गणेशाला बेसनाचे लाडू अर्पण करावेत. बाप्पाला केळ्याचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे. यामुळे या दिवसात देवाला केळ्याचा नैवेद्य आवर्जुन दाखवावा.

तसेच गणपतीला मखान्याची खीर प्रिय आहे. यामुळे त्याचाही नैवेद्य द्यावा. पूजा व्रतात नारळाला फारच महत्व आहे. यामुळे बाप्पाला नारळापासून बनवलेले गोड पदार्थ जसे नाराळाची बर्फी, लाडू तर नुसता नारळही नैवेद्य म्हणून काही ठिकाणी दाखवला जातो. तसेच विघ्ननाशक बाप्पाला खव्याचे लाडूही नैवेद्य म्हणून अर्पण केले जातात. दूधापासून बनवण्यात आलेले कलाकंदही गणपतीला प्रिय आहेत. यामुळे त्याचाही नैवेद्य दाखवावा. तसेच या दहा दिवसात केसर श्रीखंडांचा नैवेद्य बाप्पाला अर्पण केला जातो.

First Published on: August 23, 2022 4:09 PM
Exit mobile version