Monday, May 6, 2024
घरमानिनीReligiousGuru Pushya Yoga : वर्षाच्या शेवटच्या गुरुपुष्यामृत योगात करा 'हे' उपाय

Guru Pushya Yoga : वर्षाच्या शेवटच्या गुरुपुष्यामृत योगात करा ‘हे’ उपाय

Subscribe

ज्योतिष शास्त्रातील 27 नक्षत्रांपैकी पुष्य नक्षत्राला सर्वोत्तम मानले जाते. जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी असते. तेव्हा गुरुपुष्यामृत योग तयार होतो. गुरुपुष्यामृताचा दिवस खूप शुभ मानला जातो. त्यामुळे या दिवशी कोणतेही शुभ कार्य तसेच खरेदी करणं सर्वोत्तम मानलं जातं.

गुरुपुष्यामृत तिथी

गुरुपुष्यामृत या महिन्यात 29 डिसेंबर 2023 रोजी असणार आहे. गुरुपुष्य नक्षत्र 29 डिसेंबर 2023 रोजी पहाटे 01:03 वाजता सुरू होईल. जो रात्री 07: 12 पर्यंत असेल. 29 डिसेंबरचा संपूर्ण दिवस खरेदीसाठी शुभ मुहूर्त आहे.

- Advertisement -

गुरुपुष्य योगाचे महत्त्व

या दिवशी श्री विष्णू आणि बृहस्पती देवाची पूजा देखील केली जाते. भगवान विष्णू आणि बृहस्पती देवाची पूजा केल्यास वैभव, सुख आणि संपत्ती प्राप्त होते. पौराणिक कथेनुसार, या नक्षत्रात बृहस्पती देव यांचा जन्म झाला होता. नारद पुराणानुसार या नक्षत्रात जन्मलेले व्यक्ती दयाळू, धार्मिक, बलवान, धनवान, विविध कलांचा जाणकार आणि सत्यवादी असतात. या नक्षत्रात केलेली सर्व कर्मे शुभ मानली जातात.

- Advertisement -

गुरुपुष्यामृतात करा ‘हे’ उपाय

  • या शुभ दिवशी देवी लक्ष्मींसोबत श्री विष्णूंची देखील पूजा-आराधना करावी.
  • या पूजेमध्ये ‘ओम श्रीं ह्रीं दारिद्रय विनाशिन्ये धनधान्य समृद्धि देहि देहि नम:’ या मंत्राने 108 वेळा जप करा.
  • गुरु पुष्य योगाच्या दिवशी तुम्ही लक्ष्मीच्या कनकधारा स्तोत्र आणि श्री सुक्ताचे पठण करा.
  • तसेच या योगात सोने, चांदी नवीन वस्तू खरेदी करणं शुभ मानलं जातं.

हेही वाचा :

देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी पौर्णिमेला करा ‘हे’ उपाय

- Advertisment -

Manini