Friday, April 26, 2024
घरमानिनीReligiousGuru Pushya Yoga : उद्या आहे गुरुपुष्यामृत; शुभ योगात करा 'हे' उपाय

Guru Pushya Yoga : उद्या आहे गुरुपुष्यामृत; शुभ योगात करा ‘हे’ उपाय

Subscribe

ज्योतिष शास्त्रातील 27 नक्षत्रांपैकी पुष्य नक्षत्राला सर्वोत्तम मानले जाते. जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी असते. तेव्हा गुरुपुष्यामृत योग तयार होतो. गुरुपुष्यामृताचा दिवस खूप शुभ मानला जातो. त्यामुळे या दिवशी कोणतेही शुभ कार्य तसेच खरेदी करणं सर्वोत्तम मानलं जातं.

गुरुपुष्यामृत तिथी

गुरुपुष्यामृत या महिन्यात 25 मे 2023 रोजी असणार आहे. गुरुपुष्य नक्षत्र 24 मे 2023 रोजी दुपारी 03:06 वाजता सुरू होईल आणि 25 मे 2023 रोजी संध्याकाळी 05:54 वाजता समाप्त होईल. गुरुवारी दिवसभर पुष्य योग असल्याने या दिवशी खरेदी करणे शुभ राहील.

- Advertisement -
गुरुपुष्य योगाचे महत्त्व

या दिवशी श्री विष्णू आणि बृहस्पती देवाची पूजा देखील केली जाते. आज भगवान विष्णू आणि बृहस्पती देवाची पूजा केल्यास वैभव, सुख आणि संपत्ती प्राप्त होते. पौराणिक कथेनुसार, या नक्षत्रात बृहस्पती देव यांचा जन्म झाला होता. नारद पुराणानुसार या नक्षत्रात जन्मलेले व्यक्ती दयाळू, धार्मिक, बलवान, धनवान, विविध कलांचा जाणकार आणि सत्यवादी असतात. या नक्षत्रात केलेली सर्व कर्मे शुभ मानली जातात. परंतु, देवी पार्वतीच्या विवाहाच्या वेळी शिवाकडून मिळालेल्या शापामुळे हे नक्षत्र पाणिग्रहण विधींसाठी वर्ज्य माले जाते.

गुरुपुष्यामृतात करा ‘हे’ उपाय

पूजा में प्रयोग होने वाले कलश से मां सीता का क्या है CONNECTION - what is  the connection between pujan kalash and devi sita

- Advertisement -
  • या शुभ दिवशी देवी लक्ष्मींसोबत श्री विष्णूंची देखील पूजा-आराधना करावी.
  • या पूजेमध्ये ‘ओम श्रीं ह्रीं दारिद्रय विनाशिन्ये धनधान्य समृद्धि देहि देहि नम:’ या मंत्राने 108 वेळा जप करा.
  • गुरु पुष्य योगाच्या दिवशी तुम्ही लक्ष्मीच्या कनकधारा स्तोत्र आणि श्री सुक्ताचे पठण करा.

हेही वाचा :

Vat Purnima : वटपौर्णिमेच्या दिवशी करू नका ‘या’ चुका

- Advertisment -

Manini