Tuesday, May 14, 2024
घरमानिनीBeautyBeauty : हिवाळ्यात करा चंदन तेलाने मालिश

Beauty : हिवाळ्यात करा चंदन तेलाने मालिश

Subscribe

हिवाळ्यात आपण बॉडिकेअरसाठी बरेचजण अनेक मॉइश्चराइज्ड आणि तेलांचा वापर करत असतो. हे करत असताना बऱ्याच जणांना हवा तसा आराम मिळत नाही. पण जर का तुम्ही चंदन तेलाने हिवाळ्यात शरीराला मालिश करत असाल तर त्यांचे असंख्य फायदे तुम्हाला झालेले पाहायला मिळतील.

हिवाळ्यात त्वचा निस्तेज दिसू लागते आणि यासाठी आपण बरेच मार्केट प्रॉडक्ट्स विकत घेतो पण याचा परिणाम आपल्याला झालेला दिसत नाही. कोणताही मसाज करत करताना आधी मसाज संपूर्ण करून घ्या आणि अर्धा तासानंतर आंघोळीला जा. यामुळे संपूर्ण तेल शरीराच्या आतमध्ये मुरते आणि शरीराला आराम मिळतो. तसेच हिवाळ्यात स्किन रफ आणि ड्राय होते त्यामुळे योग्य तो मसाज करून शरीराला मसाज करणे अत्यंत गरजेचे आहे.

- Advertisement -

Massage Oil" Images – Browse 9,763 Stock Photos, Vectors, and Video | Adobe  Stock

रोजच्या स्किनकेअरमध्ये चंदन तेलाचे फायदे पुढीलप्रमाणे-

हिवाळ्यात चंदनाच्या तेलाने मसाज केल्यावर शरीराला याचे द्विगुणित फायदे झालेले पाहायला मिळतात. तसेच चंदन पावडर किंवा चंदन साबण जर का तुमच्या रोजच्या वापरात नसेल तर ती सुद्धा तुम्ही वापरू शकता. ज्यामुळे स्किन तजेलदार आणि हेल्दी राहते.

- Advertisement -

1. त्वचेचे पोषण-

चंदनाचे तेल त्वचेतील आर्द्रता भरून काढते. तसेच हिवाळ्यातील कोरडेपणा नाहीसा करते. तसेच तुमची त्वचा सारखी डिहायड्रेड होत असेल तर ती चंदनाच्या तेलाने हायड्रेड राहते. यामुळे त्वचेला टवटवीतपणा येतो आणि तुमचा उत्साही वाढतो.

2. सुगंधी अनुभव-

चंदनाचे तेल त्याच्या सुगंधासाठी प्रसिद्ध आहे. तसेच चंदनाचे तेल तुमच्या नैसर्गिक त्वचेला उजळ करते. चंदनाच्या सिंथेटिक सुगंधामुळे तुमचा मूड सुधारतो. कामामुळे तुम्हाला थकवा जर का येत असेल तर आंगोळीच्या आधी चंदन तेलाने बॉडी मसाज करा यामुळे तुम्हाला रिफ्रेश वाटेल तसेच थकवा सुद्धा नाहीसा होईल. शरीराला थंडावा मिळेल आणि कंटाळवाणे वाटणार नाही.

3. आराम आणि तणावमुक्ती-

चंदनाच्या तेलाचा शांत आणि सुखद अनुभव तुम्हाला तणावमुक्त करतो. आंघोळीच्या वेळी तणाव आणि चिंता दूर करण्यासाठी चंदन तेल अतिशय गुणकारी आहे. आंघोळीच्या उत्पादनांमध्ये चंदनाच्या तेलाचा समावेश केल्याने तुमच्या त्वचेसाठी आणि एकूणच आरोग्यासाठी अनेक फायदे होतात. शरीराला खाज येत असेल किंवा पुरळ येत असतील तर चंदन तेल खूप उपयुक्त ठरेल.


हेही वाचा : प्लम ऑइल स्किनसाठी आहे बेस्ट…

- Advertisment -

Manini