Saturday, May 11, 2024
घरमानिनीReligiousKojagiri Purnima 2023 : कोजागरी पौर्णिमेला खीर का खातात?

Kojagiri Purnima 2023 : कोजागरी पौर्णिमेला खीर का खातात?

Subscribe

अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला शरद पौर्णिमा किंवा कोजागरी पौर्णिमा देखील म्हटलं जातं. ज्योतिष मान्यतेनुसार पुर्ण वर्षामध्ये फक्त याचं दिवशी चंद्र 16 कलांचा असतो. याचं दिवशी श्रीकृष्णांनी यमुना नदीच्या तटावर बासरी वाजवून गोपिकांसोबत रासगर्बा खेळला होता. या वर्षी 28 ऑक्टोबर 2023 रोजी असणार आहे.

कोजागिरी पौर्णिमेची तिथी

अश्विन शुक्ल पक्षाची पौर्णिमा म्हणजेच शरद पौर्णिमा शनिवार 28 ऑक्टोबर 2023 रोजी पहाटे 4:17 पासून सुरू होईल आणि रविवार, 29 ऑक्टोबर रोजी दुपारी 1:53 पर्यंत राहील. त्यामुळे 28 ऑक्टोबर, शनिवारी शरद पौर्णिमा साजरी केली जाईल.

- Advertisement -

शास्त्रानुसार, कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी रात्री तिच्या वाहनावर बसून पृथ्वीवर भ्रमण करण्यासाठी येतात आणि भक्तांच्या समस्या दूर करतात. पौराणिक कथेनुसार, या दिवशीच देवी लक्ष्मींचा जन्म झाला होता. त्यामुळे हा दिवस धन प्राप्तीचे उपाय करण्यासाठी देखील उत्तम मानला जातो.

कोजागरी पौर्णिमेला खीर का खातात?

मान्यतेनुसार, शरद पौर्णिमेच्या दिवशी चंद्राच्या प्रकाशात ठेवलेली खीर खाल्ल्याने रोगांपासून मुक्ति मिळते. ही खीर अमृतासमान मानली जाते.

- Advertisement -

धन, संपत्ती मिळवण्यासाठी करा ‘हा’ उपाय

रात्रीच्या वेळी देवी लक्ष्मीसमोर तूपाचा दीवा लावा. तसेच त्यांना गुलाबाच्या फुलांची माळ अर्पण करा. खीरीचा नैवेद्य दाखवा. त्यानंतर देवी लक्ष्मीच्या “ॐ ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद महालक्ष्मये नमः” या मंत्राचा जप करा. देवी लक्ष्मी जीवनातील अनेक समस्या दूर करतात.


हेही वाचा :

Kojagiri Purnima 2023 : कोजागिरी पौर्णिमेला करा देवी लक्ष्मीची पूजा; वाचा पूजेचा शुभ मुहूर्त

- Advertisment -

Manini