घरभक्तीकोजागरी पौर्णिमेला काय करावे? जाणून घ्या पौराणिक कथा

कोजागरी पौर्णिमेला काय करावे? जाणून घ्या पौराणिक कथा

Subscribe

अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला शरद पौर्णिमा किंवा कोजागरी पौर्णिमा देखील म्हटलं जातं. ज्योतिष मान्यतेनुसार पुर्ण वर्षामध्ये फक्त याचं दिवशी चंद्र 16 कलांचा असतो. याचं दिवशी श्रीकृष्णांनी यमुना नदीच्या तटावर बासरी वाजवून गोपिकांसोबत रासगर्बा खेळला होता. या वर्षी 9 ऑक्टोबर 2022 रोजी असणार आहे.

कोजागरी पौर्णिमेला काय करावे?

- Advertisement -
  • कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करा. त्यानंतर घरातील देवी-देवतांची पूजा करा.
  • रात्री जागरण करून भगवान विष्णू, देवी लक्ष्मी यांची उपासना करा. त्यांच्या मंत्राचे पठण करा.
    कोजागिरी पौर्णिमेची कथेचे पठण करा.
  • त्यानंतर चंद्राच्या प्रकाशात केशर दूध तयार करा आणि प्या.

कोजागरी पौर्णिमेची कथा
एका सावकारला दोन मुली होत्या. त्या दोघीही पौर्णिमेचे व्रत करायच्या. मोठी मुलगी खूप हे मनापासून विधीवत पूर्ण करायची. तर धाकटी मुलगी हे व्रत अर्धवट ठेवायची. जेव्हा त्या दोघींचे लग्न झाले. त्यानंतर मोठ्या मुलीला मुलं झाली. परंतु धाकट्या मुलीला झालेल्या मुलांचा जन्म होताच मृत्यू होऊ लागला. तेव्हा तिला विद्वान पंडितांकडून सांगण्यात आलं की, तिने पौर्णिमेचे व्रत अर्धवट केल्याने तिच्या मुलांचा मृत्यू होत आहे.

त्यानंतर त्या धाकट्या मुलीने पूर्ण विधीने पौर्णिमेचा उपवास केला, नंतर काही महिन्यांनी तिला पुन्हा मुलगा झाला, पण तोही लवकर मरण पावला. त्यावेळी तिने त्या बाळाला झोपवले आणि त्यावर कपडा टाकला. मग मोठ्या बहिणीला बोलावून तिथेच बसायला जागा दिली, मोठी बहिण बसणारच होती की तेवढ्यात तिच्या साडीचा स्पर्श त्या मुलाला झाला आणि ते मुल रडायला लागले. यावर मोठ्या बहिणीला राग आला आणि ती म्हणाली की तुला माझ्यावर कलंक लावायचा होता का, माझ्या बसण्यामुळे हे मूल मरण पावले असते, तेव्हा त्या लहान बहिणीने तिला संपूर्ण गोष्ट सांगितली की ते तुझ्या पुण्याने ते जिवंत झाले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -