Friday, May 17, 2024
घरमानिनीReligiousशुक्रवारी कधीही करू नका 'या' गोष्टी; नाहीतर लक्ष्मीची होईल अवकृपा

शुक्रवारी कधीही करू नका ‘या’ गोष्टी; नाहीतर लक्ष्मीची होईल अवकृपा

Subscribe

हिंदू धर्मात आठवड्यातील प्रत्येक वार विशिष्ट देवाला/ग्रहाला समर्पित करण्यात आला आहे. शुक्रवार हा दिवस देवी लक्ष्मीला समर्पित आहे. त्यामुळे शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. देवी लक्ष्मीची पूजा केल्याने कुटुंबात सुख-समृद्धी वाढते. मात्र, या दिवशी देवीच्या पूजेसोबतच काही विशिष्ट नियमांचे पालन केले पाहिजे. शास्त्रात, शुक्रवारी काही कामे करण्यास मनाई असल्याचे सांगण्यात आले आहे. नाहीतर यामुळे देवी लक्ष्मी तुमच्यावर नाराज होऊ शकतात.

शुक्रवारी कधीही करू नका ‘या’ गोष्टी

Kichijōji: A Japanese town named after Hindu goddess Lakshmi, Tokyo - Times  of India Travel

- Advertisement -
  • शुक्रवारी कधीही नॉनव्हेज आणि अल्कोहोलचे सेवन करू नये. शुक्रवारी सात्विक अन्नच खावे. यामुळे घरात दुःख आणि गरिबी येते.
  • शुक्रवारी कर्जाचे कोणतेही व्यवहार करू नये. कारण देवी लक्ष्मी धनाची देवी आहे. या दिवशी पैसे उधार घेणे किंवा देणे अत्यंत अशुभ आहे. यामुळे गरिबी येते.
  • शुक्रवारी कधीही कोणाला साखर, दही, ताक यांसारख्या गोष्टी कोणालाही देऊ नका. यामुळे कुंडलीत शुक्र ग्रह कमजोर होतो आणि जीवनात दुःख, दारिद्र्य येते.
  • घरामध्ये नेहमी स्वच्छता राखली पाहिजे, परंतु शुक्रवारी याची विशेष काळजी घ्या. जेणेकरून देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन तुमच्या घरात वास करतील.

हेही वाचा :

देवी लक्ष्मीच्या नावावरुन तुमच्या मुलीसाठी निवडा ‘हे’ सुंदर नाव

- Advertisment -

Manini