भगवान श्रीकृष्णांच्या ‘या’ महामंत्राने मिळते मन:शांती

भगवान श्रीकृष्णांच्या ‘या’ महामंत्राने मिळते मन:शांती

हिंदू धर्मात देवी-देवतांच्या पूजेसोबतच मंत्रजापाचे विशेष महत्त्व देखील सांगितले जाते. मंत्रांशिवाय कोणतीही पूजाविधी पूर्ण मानला जात नाही, पूर्वीपासून मंत्र पठण आणि जप करण्याची परंपरा आहे. अनेकजण आपल्या इष्टदेवतेला प्रसन्न करण्यासाठी त्या देवतेचा मंत्र जप करतात. त्यापैकी कोणी महादेवांच्या मंत्राचा जप करतं तर कोणी गायत्री मंत्राचा जप करतं. हिंदू धर्मातील सर्वच देवी देवतांचे मंत्र परिपूर्ण आहेत. आज आम्ही तुम्हाला भगवान श्रीकृष्णाच्या अशाच एका महामंत्राबद्दल सांगणार आहोत. ज्याचा जप केल्याने व्यक्तीच्या सर्वमनोकामना पूर्ण होतात.

भगवान श्रीकृष्णांच्या या महा मंत्राने मन होते शांत

भगवान श्रींकृष्णांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी ‘हरे कृष्ण हरे राम’ या महामंत्रचा जप करण्यास सांगितले जाते. असे मानले जाते की, या मंत्राचा जप केल्याने केवळ देवाशीच नव्हे तर स्वतःशी देखील जोडण्यास मदत होते. या मंत्राचा जप केल्याने जीवनात सकारात्मकता येते.

‘हरे कृष्ण हरे राम’ मंत्राचे फायदे

भगवद्गीतेमध्ये असे म्हटले आहे की जर एखाद्याचे मन त्याच्या नियंत्रणाबाहेर असेल तर तो स्वतःचा शत्रू होतो. अशा स्थितीत हरे कृष्ण हरे राम मंत्राचा जप केल्याने माणसाला त्याच्या मनावर नियंत्रण मिळवता येते आणि मनाला शांती मिळते. तसेच यामुळे व्यक्तीला मानसिक शांती मिळते.

असं म्हणतात की, या मंत्राचा जप केल्याने व्यक्तीला मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो. मृत्यूनंतर जीवन-मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त व्हावे, अशी प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते. अशा स्थितीत जे भक्त या मंत्राचा जप करतात त्याचा देवाशी असलेला हा संबंध त्याला मोक्षाकडे घेऊन जातो.


हेही वाचा :

Mahamrutunjay Mantra : महामृत्युंजय मंत्राचा जप का करावा? ‘हे’ आहेत फायदे

First Published on: June 4, 2023 10:19 PM
Exit mobile version