Wednesday, May 1, 2024
घरमानिनीReligiousमहामृत्युंजय मंत्राचा जप का करावा? वाचा फायदे

महामृत्युंजय मंत्राचा जप का करावा? वाचा फायदे

Subscribe

हिंदू धर्मात देवी-देवातांच्या नियमित पूजेसोबतच त्यांच्या मंत्राचं आणि स्तोत्रांचं पठण करणं महत्त्वपूर्ण मानलं जातं. आठवड्यातील प्रत्येक वार वेग-वेगळ्या देवी-देवातांना समर्पित करण्यात आला आहे. सोमवार आणि महिन्यातील प्रदोष व्रत भगवान शंकराला समर्पित करण्यात आले आहे. या दिवशी महादेवाला प्रसन्न करण्यासाठी अनेकजण महामृत्यूंजय मंत्राचा जप करतात. हिंदू पुराणांनुसार, नियमित महामृत्यूंजय मंत्राचा जप केल्याने व्यक्तिचा कधीही अकाल मृत्यू होत नाही.

महामृत्युंजय मंत्र

सावन में महामृत्युंजय मंत्र करते समय न करें ये गलतियां, हो सकते है शिव रुष्ट- Dont do these mistake during mahamrityunjaya mantra jaap - India TV Hindi

- Advertisement -

 

ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्।
उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात्॥

- Advertisement -

महामृत्यूंजय मंत्राचा जप केल्याने होतात ‘हे’ फायदे

Best Shiva Nataraja ideas. nataraja, shiva, hindu gods, Dancing Shiva HD wallpaper | Pxfuel

  • नियमित महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने मांगलिक दोष, नाडी दोष, कालसर्प दोष, भूत-प्रेत दोष, रोग, दुःस्वप्न असे अनेक दोष नष्ट होतात.
  • ज्या व्यक्तीला दीर्घायुष्य प्राप्त करायचे आहे, त्यांनी महामृत्युजय मंत्राचा नियमित जप करावा. या मंत्राच्या प्रभावाने माणसाच्या अकाली मृत्यूची भीती नाहीशी होते. हा मंत्र भगवान शिवाला अतिशय प्रिय आहे, जो त्याचा जप करतो त्याला दीर्घायुष्य मिळते.
  • या मंत्राचा जप केल्याने आरोग्य समस्या दूर होतात. असाध्य रोग देखील नष्ट होतो.
  • समाजात पद-प्रतिष्ठा प्राप्त करण्यासाठी देखील या मंत्राचा जाप केला जातो.

महामृत्यूंजय मंत्राचा जप कसा करावा

  • धार्मिक ग्रंथानुसार सकाळी किंवा संध्याकाळी महामृत्युंजय मंत्राचा जप करणं उत्तम मानले जातं.
  • सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे.
  • घरातील स्वच्छ ठिकाणी बसून समोर धूप, दिप लावून या मंत्राचे पठण करावे.
  • महामृत्यूंजय मंत्राचा जप कधीही रुद्राक्षाच्या माळेने करावा.
  • जप करताना कोणताही वाईट, नकारात्मक विचार मनात आणू नये.
  • जप करताना मग एकाग्र करावे.

हेही वाचा :

सोमवारी शिव चालीसाचे पठण केल्याने मिळते अपार धन-संपत्ती

- Advertisment -

Manini