भारतातील ‘या’ रहस्यमय मंदिरात रात्री जाण्यास घाबरतात लोक

भारतातील ‘या’ रहस्यमय मंदिरात रात्री जाण्यास घाबरतात लोक

भारत एक असा देश आहे , ज्यात अनेक रहस्य आणि आकर्षणे आहेत. भारतातील मंदिरं, किल्ले, देवी-देवता यांबाबत अनेक कथा आणि रहस्य प्रचलित आहेत. भारतात अशीच काही अनोखी पौराणिक मंदिरं देखील आहेत. ज्याबाबत अनेक अनोख्या घटना सांगितल्या जातात. आज आम्ही तुम्हाला राजस्थानातील त्या रहस्यमय मंदिराबद्दल सांगणार आहोत. जिथे रात्री कधीही कोणी फिरकत नाही. कारण रात्री या मंदिरात जो कोणी थांबतो तो दगड होतो अशी मान्यता आहे.

राजस्थानच्या बारमेर जिल्ह्यात असलेले हे मंदिर किराडू मंदिर म्हणून ओळखले जाते. या मंदिराला राजस्थानचे खजुराहो असेही म्हणतात. दक्षिण भारतीय शैलीत बांधलेले हे मंदिर त्याच्या वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आहे. या मंदिरांची रचना पाहता ती गुर्जरा-प्रतिहार राजवंश, संगम राजवट किंवा दक्षिणेतील गुप्त राजवटीत बांधली गेली असावीत असा अंदाज येतो.

किराडू ही पाच मंदिरांची साखळी आहे, त्यापैकी सध्या विष्णू आणि शिव मंदिर ठीक स्थितीत आहे. तर बाकी तीन मंदिरांचे काही अवशेष या पाहायला मिळतात.

काय आहे मंदिराचे रहस्य?

 

या मंदिराबाबत अशी मान्यता आहे की, अनेक वर्षांपूर्वी या ठिकाणी एक सिद्ध साधू आपल्या काही शिष्यांसह आला होता. एके दिवशी आपल्या शिष्यांना तिथे सोडून ते भ्रमण करण्यासाठी निघून गेला. या वेळी त्यातील एका शिष्याची प्रकृती खालावली. त्यावेळी यानंतर इतर शिष्यांनी गावकऱ्यांकडे मदत मागितली, परंतु कोणीही मदत केली नाही. नंतर तेथे सिद्ध साधू आल्यावर त्यांना सर्व काही कळले. यावर तो संतापला आणि त्याने गावकऱ्यांना शाप दिला की, सूर्यास्तानंतर सर्व लोक दगड होतील.

मात्र, गावातील एका महिलेने साधूच्या शिष्यांना मदत केली होती, त्यामुळे साधूने त्या महिलेला संध्याकाळ होण्यापूर्वी गाव सोडण्यास सांगितले आणि मागे वळून पाहू नको असे देखील सांगितले. परंतु गाव सोडताना ती महिला मागे वळून पाहू लागली. ज्यानंतर ती देखील गावकऱ्यांप्रमाणे दगड झाली. त्या महिलेची मूर्तीही मंदिरापासून थोड्या अंतरावर स्थापित आहे.


हेही वाचा :

वृंदावनातील ‘ही’ तीन रहस्य तुम्हाला ठाऊक आहेत का?

First Published on: May 13, 2023 3:52 PM
Exit mobile version