शनिची उलटी चाल, ‘या’ राशींवर पडणार भारी

शनिची उलटी चाल, ‘या’ राशींवर पडणार भारी

ज्योतिष शास्रानुसार कर्मफळ दाता आणि न्याय देवता शनि देवतेच्या चालीचा परिणाम हा प्रत्येक राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यावर पडतो. यावेळी शनि हा कुंभ राशित विराजमान झाला आहे. त्याचसोबत येणाऱ्या १७ जून २०२३ रोजी रात्री १० वाजून ४८ मिनिटांनी या राशीत उलटी चाल चालणार आहेत. त्याचसोबत शनि देव कुंभ राशीत ४ नोव्हेंबर, २०२३ च्या सकाळी ८ वाजून २६ मिनिटांपर्यंत उलट चाल जाणार आणि नंतर पुन: मार्गी लागणार आहेत. शनिच्या उलट्या चालीमुळे काही राशींना लाभ तर काही राशींना समस्या उद्भवू शकतात. शनिच्या कुंभ राशीतील उलट्या चालीमुळे समस्या अधिक वाढू शकतात.

शनिच्या उलट्या चालीमुळे या राशींना येऊ शकतात समस्या
-मेष
शनीच्या उलट्या चालीमुळे या राशीतील व्यक्तीच्या आयुष्यावर अधिक प्रभाव टाकू शकतो. अधिक मेहनत केल्यानंतर ही कामात यश काही मनासारखे मिळणार नाही. त्याचसोबत आरोग्यासंबंधित समस्यांचा सामना सुद्धा करावा लागू शकतो. अशातच शारिरीक आणि मानसिक तणाव वाढू शकतो. वैवाहिक आणि लव्ह लाइफमध्ये थोड्या तणावाचा सामना करु शकता. परंतु तुम्हाला धन लाभ होण्याची शक्यता दिसून येत आहे.

-वृषभ
या राशीत शनि दहाव्या घरात उलटी चाल चालणार आहे. अशातच या राशीच्या व्यक्तींचा येणारा काही काळ हा धावपळीचा राहणार आहे. नव्या नोकरीच्या शोधात असलेल्यांना थोडा वेळ वाट पहाणे फायदेशीर ठरणार आहे. त्याचसोबत काही कामांमध्ये उशिर होऊ शकतो. आई-वडिलांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या.

-कर्क
या राशिवर आधीपासून शनिचा प्रभाव सुरु आहे. याचसोबत आठव्या घरात शनि उलटी चाल चालणार आहे. अशातच या राशीच्या व्यक्तींना आयुष्यात समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आरोग्याची विशेष काळजी घ्या. कामाबद्दल मूड थोडा बिघडू शकतो. मात्र मानसिक तणाव तुमच्यावर अधिक प्रभाव करणार नाही याची काळजी घ्या. वैवाहिकक आयुष्यात थोडा तणाव निर्माण होऊ शकतो.

-तुळ
या राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात शनिच्या उलट्या चालीमुळे समस्या अधिक वाढू शकतात. नोकरी संदर्भात समस्या येऊ शकते. नोकरी बदलू करु इच्छित असाल तर थोडा वेळ घ्या. लव्ह लाइफमध्ये थोडीशी समस्या निर्माण होऊ शकते.

-कुंभ
शनि या राशीच उलटी चाल करणार आङे. त्याचसोबत तुमच्या राशीत आधीपासूनच साडेसाती सुरु आहे. यामुळे या राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात शारिरीक आणि मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. आरोग्यासंदर्भात थोडी काळजी घ्या, वैवाहिक आयुष्यात ही तणावाची स्थिती निर्माण होऊ शकते. परंतु वेळेसह सर्वकाही उत्तम होऊ शकते. करियर संदर्भात थोडे सतर्क रहा.

 


हेही वाचा: तुमच्या राशीनुसार ‘ही’ आहे तुमची इष्ट देवता

First Published on: April 19, 2023 1:08 PM
Exit mobile version