घरभक्तीतुमच्या राशीनुसार 'ही' आहे तुमची इष्ट देवता

तुमच्या राशीनुसार ‘ही’ आहे तुमची इष्ट देवता

Subscribe

हिंदू धर्मात आपण आपल्या आवडीनुसार कोणत्याही देवाची पूजा-आराधना करु शकतो. मात्र, आपल्या इष्ट देवाची पूजा करणं देखील आपल्यासाठी महत्वपूर्ण मानलं जातं. कारण इष्ट देवतेचा संबंध आपले कर्म आणि जीवनाशी संबंधित आहे. धार्मिक मान्यतेनुसार, इष्ट देवतेची पूजा-आराधना केल्याने आपल्या आधिक शुभ फळांची प्राप्ती होते. इष्ट देवता आपल्या राशीनुसार देखील ठरवली जाते.

राशीनुसार माहिती करा इष्ट देवता

Hindu Gods And Their Rashi - Zodiac Signs Hindu Gods And Goddesses - Indian Astrology

- Advertisement -
  • मेष आणि वृश्चिक

मेष आणि वृश्चिक राशीचा स्वामी ग्रह मंगळ आहे. त्यामुळे राशींच्या व्यक्तींनी नेहमी हनुमानांची पूजा करावी.

  • वृषभ आणि तूळ

वृषभ आणि तूळ या राशींचा स्वामी ग्रह शुक्र आहे. त्यामुळे या राशींच्या व्यक्तींनी देवी लक्ष्मी किंवा देवी दुर्गेची उपासना करावी.

- Advertisement -
  • मिथुन आणि कन्या

मिथुन आणि कन्या या राशींचा स्वामी ग्रह बुध आहे. या राशींच्या व्यक्तींनी श्री गणेश आणि श्री विष्णूंची पूजा करावी.

  • कर्क

कर्क राशीचा स्वामी ग्रह चंद्र आहे. त्यामुळे या व्यक्तींनी नेहमी महादेवाची आराधना करावी.

  • सिंह

सिंह राशीचा स्वामी ग्रह सूर्य आहे. त्यामुळे या व्यक्तींनी नेहमी श्री हनुमान आणि गायत्री देवीची पूजा करावी.

  • धनू आणि मीन

धनू आणि मीन राशीचा स्वामी ग्रह गुरु आहे. त्यामुळे या व्यक्तींनी श्री विष्णू आणि देवी लक्ष्मीची तसेच गुरुदत्तांची पूजा करावी.

  • मकर आणि कुंभ

मकर आणि कुंभ राशीचा स्वामी ग्रह शनी आहे. त्यामुळे या व्यक्तींनी नेहमी महादेव आणि श्री हनुमानांची पूजा करावी.

राशीनुसार, आपल्या इष्ट देवतेची पूजा केल्याने लवकर फलप्राप्ती होते. मात्र, इष्ट देवतेसोबतच तुम्ही तुमच्या आवडत्या देवाची देखील पूजा करु शकता.

 


हेही वाचा :

गुरु चांडाळ योग! पुढचे सात महिने ‘या’ 3 राशींसाठी असणार त्रासदायक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -