Friday, May 17, 2024
घरमानिनीReligious'या' दोन प्राण्यांना दररोज पोळी खाऊ घातल्याने येते सुख-समृद्धी

‘या’ दोन प्राण्यांना दररोज पोळी खाऊ घातल्याने येते सुख-समृद्धी

Subscribe

भारतातील प्रत्येक घरामध्ये दररोजच्या जेवणात पोळीचा समावेश असतो. भारतीय आहारामध्ये पोळीला खूप महत्वपूर्ण मानले जाते. पोळीशिवाय जेवण पूर्ण मानले जात नाही. ज्योतिष शास्त्रातही पोळीसंबंधीत अनेक उपाय सांगितले जातात. ज्यामुळे व्यक्तीच्या आयुष्यातील अनेक संकटं दूर होतात. हिंदू धर्मामध्ये पशू-पक्षांना अन्न दान करणं देखील खूप शुभ मानलं जातं. असं म्हणतात की, पोळी बनवताना सर्वात आधी तयार केलेली आणि सर्वात शेवटी तयार केलेली पोळी राखून ठेवावी आणि ती गायी आणि कुत्र्याला खाऊ घालावी.

पहिली पोळी गायीला

Chapati | Indian Recipes | GoodTo

- Advertisement -

हिंदू धर्मात गायीला आईसमान मानले जाते. गायीची पूजा आणि सेवा केल्याने पापांपासून मुक्ती मिळते. आजच्या काळात गायीची पूजा करणे आणि सेवा करणे सहज शक्य होत नाही. त्यामुळे निदान दररोज एक पोळी गायीला खाऊ घातल्याने आयुष्यात सुख-समृद्धी येते. रोज पहिली पोळी गायीला खाऊ घातल्याने सर्व देवी-देवता प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात. ज्या घरामध्ये रोज पहिली रोटी गायीला खायला दिली जाते, त्या घरामध्ये नेहमी भरपूर धन-समृद्धी असते.

शेवटची पोळी कुत्र्याला

What Is Chapati And How Do You Eat It?

- Advertisement -

ज्योतिष शास्त्रात कुत्र्याला राहू ग्रहाशी जोडले गेले आहे. त्यामुळे कुत्र्याला शेवटची तयार केलेली पोळी खाऊ घालावी. कुत्र्याला पोळी खाऊ घातल्याने कुंडलीतील शनी दोष आणि राहू-केतू दोष दूर होतात. शिवाय आर्थिक संकटही दूर होते.

 


हेही वाचा :

‘या’ बोटामध्ये सोन्याची अंगठी घातल्याने वाढते दारिद्र्य

- Advertisment -

Manini