यावर्षी दसऱ्याला आहेत ‘हे’ तीन विशेष मुहूर्त

यावर्षी दसऱ्याला आहेत ‘हे’ तीन विशेष मुहूर्त

अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातल्या दशमीला सर्वत्र दसरा साजरा केला जातो. विजयादशमी अर्थात दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. नऊ दिवसांच्या नवरात्रोत्सवाची दसऱ्याच्या दिवशी सांगता होते. या दिवशी देवीची पूजा केली जाते आणि रावण दहन सुद्धा केले जाते. यावर्षी ५ ऑक्टोबर रोजी सर्वत्र दसरा साजरा केला जाणार आहे. देशभरातच दसऱ्याचा उत्साह दिसत आहे. ज्योतिष शास्त्रानुसार दसऱ्याच्या दिवशी अनेक शुभ योग्य येत आहेत. त्यामुळे या दिवसाचं विशेष महत्व आहे.

हे ही वाचा – Dussehra 2021 : दसरा सण मोठा, खरेदीला नाही तोटा; वाहन, सोने बाजाराला नवी झळाळी

कोणत्याही नवीन वस्तूची खरेदी करण्यासाठी किंवा नवीन आणि शुभ कामाला सुरुवात कारण्यासाठी दसऱ्याचा मुहूर्त खूपच उत्तम आहे. यादिवशी घरोघरी सरस्वती पूजन केले जाते. त्याच बरोबर दुर्गा पूजा करून शस्त्रांची पूजा केली जाते. दुर्गा देवीने राक्षसाचा वध केला म्हणूनच वाईटावर चांगल्याचा विजय म्हणूनही या दिवसाचे महत्व आहे.

दसऱ्या दिवशी आहेत या वेळी शुभमुहूर्त

पंचांगानुसार यंदा अश्विन शुक्ल दशमी म्हणजेच दसरा 5 ऑक्टोबर 2022 रोजी सर्वत्र साजरा करण्यात येणार आहे. 4 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी दोन वाजून 20 मिनिटांनी विजयादशमी सुरु होणार आहे. तर 5 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता विजयादशमी तिथी संपेल.

यावर्षी दसऱ्याचा मुहूर्त २ वाजून सात मिनिटांपासून २ वाजून 54 मिनिटांपर्यंत असणार आहे. त्याचबरोबर दुपारचा शुभ मुहूर्त १ वाजून 20 मिनिटांपासून ते ३ वाजून 41 मिनिटांपर्यंत असणार आहे.

हे ही वाचा – Dussehra 2021: भारतातील ‘या’ सहा शहरांमध्ये साजरा होतो आगळावेगळा दसरा

दसऱ्यादिवसद्धी कोणते आहेत शुभमुहूर्त

यावर्षी दसऱ्यादिवशी तीन शुभ योग्य येत आहेत. ज्योतिषशास्त्राच्या गणनेनुसार यादिवसद्धी सुकर्मा, रवी आणि धृती असे तीन योग्य जुळून येत आहेत. यामुळे यावर्षीचा दसरा नाक्कीच शुभ फलदायी असणार आहे.

या दिवशी रवी योग सकाळी ६ वाजून 21 मिनिटांपासून ते रात्री ९ वाजून 18 मिनिटांपर्यंत आहे, सुकर्मा योग सकाळी ८ वाजून 21 मिनिटांपर्यंत आहे. तर धृती योग सकाळी ८ वाजून 21 मिनिटांपासून दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजून 19 मिनिटांपर्यंत असणार आहे.

First Published on: October 4, 2022 3:03 PM
Exit mobile version