Dussehra 2021 : दसरा सण मोठा, खरेदीला नाही तोटा; वाहन, सोने बाजाराला नवी झळाळी

on dussehra occasion vehicle and gold purchase increase in mumbai
Dussehra 2021 : दसरा सण मोठा, खरेदीला नाही तोटा; वाहन, सोने बाजाराला नवी झळाळी

नवरात्रोत्सवाची आज नववी माळ पूर्ण होत असून देशभरात विजयादशमी म्हणजेच दसरा सण साजरा केला जात आहे. य
साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जाणारा विजयादशमी म्हणजेच दसरा सणामुळे सोने आणि वाहन बाजारात चैतन्य संचारले आहे. दसर्‍याच्या मुहूर्तावर सोने, वाहन किंवा वस्तू खरेदी शुभ मानली जाते. म्हणून अनेक ग्राहक हा मुहूर्त साधून सोने इलेक्ट्रॉनिक वस्तू, वाहने, वस्तू आदींची खरेदी करण्यासाठी बाजरपेठांमध्ये गर्दी करत आहेत. ग्राहकांना आकर्षिक करण्यासाठी सोने, वाहन दुकानदारांकडूनही विविध योजनांचा वर्षाव केला जात आहे. त्यामुळे कोरोनानंतर दोन वर्षांनी प्रथमच सोने आणि वाहन बाजारपेठेतील उलाढाल वाढली असल्याने व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. (फोटोग्राफर – दीपक साळवी)