आज आहे सोमप्रदोष; जाणून घ्या पूजा विधी आणि मुहूर्त

आज आहे सोमप्रदोष; जाणून घ्या पूजा विधी आणि मुहूर्त

हिंदू पंचांगानुसार, प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत असते. शास्त्रात प्रदोष व्रताचे खूप महत्व सांगण्यात आले आहे. 17 एप्रिल म्हणजेच आज प्रदोष व्रत आहे. आज सोमवार असल्यामुळे या प्रदोष व्रताला सोमप्रदोष म्हटले जाते. सोमवारी प्रदोष व्रत आल्यावर त्याचे महत्त्व आणखी वाढते. या व्रताच्या प्रभावाने चंद्र त्याचे शुभ फल देतो. प्रदोष व्रत महादेवांना समर्पित आहे. या दिवशी उपवास आणि त्यांची भक्ती केल्याने अनेक संकटांपासून मुक्ती मिळते.

सोम प्रदोष व्रत तिथी आणि शुभ मुहूर्त

सोम प्रदोष पूजा विधी :

सोमप्रदोष व्रता केल्याने मनोकामना पूर्ण होतात


 

त्रयोदशी तिथीचे व्रत प्रदोष काळात पूजा केली जाते म्हणून याला प्रदोष व्रत म्हणतात. या दिवशी भगवान शिवाची विधिवत पूजा केल्याने मोग आणि मोक्ष प्राप्त होतो. जर प्रदोष तिथी सोमवारी आली तर त्या तिथीला सोम प्रदोष व्रत म्हणतात आणि जर प्रदोष तिथी मंगळवारी आली तर तिला भौम प्रदोष व्रत म्हणतात. संतान होण्यासाठी आणि मनोकामना पूर्ण होण्यासाठी सोम प्रदोष तिथीचे व्रत करावे, असे मानले जाते. पौराणिक मान्यता सांगते की प्रदोष तिथीला भगवान शिव कैलास पर्वताच्या रजत भवनात नृत्य करतात आणि त्या वेळी सर्व देवी-देवता त्यांची स्तुती करतात.


हेही वाचा :

Buddha Purnima 2023 : कधी आहे बौद्ध पौर्णिमा? या दिवशी असेल वर्षातील पहिले चंद्रग्रहण

First Published on: April 17, 2023 10:20 AM
Exit mobile version