Vastu Tips : शांत झोप लागत नाही? करा ‘हा’ वास्तू उपाय

Vastu Tips : शांत झोप लागत नाही? करा ‘हा’ वास्तू उपाय

सुदृढ शरीरासाठी आहार आणि व्यायामासोबतच पुरेशी झोप घेणं सुद्धा तितकचं महत्वाचे आहे. दिवसभर काम केल्यामुळे अनेकजण खूप थकलेले असतात, अशावेळी अनेकजण कोणत्याही दिशेला डोके करून झोपतात, मात्र हे त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने खूप घातक सिद्ध होऊ शकते. आपण दररोज कोणत्या दिशेला डोके शिवाय छान झोप येण्यासाठी कोणत्या गोष्टींचा अवलंब करयला हवा. याबाबत आपल्या हिंदू शास्त्रात तसेच विज्ञानातही खूप सखोल माहिती दिलेली आहे. आपण कशाप्रकारे झोपतो यावर आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टी जोडलेल्या असतात.

शांत झोप येण्यासाठी करा ‘हे’ वास्तू उपाय

वास्तू शास्त्रामध्ये झोपताना नेहमी पूर्व किंवा दक्षिणेकडे डोके करुन झोपावे. हे शुभ आणि आरोग्यासाठी उत्तम मानले जाते.

वास्तू शास्त्रानुसार जर तुमच्या घरामध्ये खूप धूळ, जाळ्या झाल्या असतील तर त्या साफ करुन घ्या. कारण यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा संचारते. त्यामुळे शांत झोप लागत नाही.

वास्तू शास्त्रामध्ये बेडसमोर कधीही आरसा ठेवू नये. मात्र, असेल तर तुम्ही झोपण्यापूर्वी आरश्यावर कपड्याने झाकून ठेवा.

रात्री झोपायच्या काही वेळ आधी घरामध्ये कापूर लावा. ज्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढेल आणि तुम्हाला झोप देखील चांगली लागेल.

शास्त्रानुसार रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्यावर सर्वात आधी देवाचे स्मरण करण्यास सांगितले जाते. झोपण्यापूर्वी देवाचे स्मरण केल्यास शांत झोप लागते.

 


हेही वाचा :

Vastu Tips :

कोणत्या दिशेला असावा घराचा मुख्य दरवाजा; जाणून घ्या शुभ-अशुभ प्रभाव

First Published on: May 25, 2023 3:30 PM
Exit mobile version