Vastu Tips : तुळशीच्या कुंडीवर काढा ‘ही’ शुभ चिन्हं; होतील अनेक फायदे

Vastu Tips : तुळशीच्या कुंडीवर काढा ‘ही’ शुभ चिन्हं; होतील अनेक फायदे

हिंदू धर्मात तुळशीच्या रोपट्याचे खूप महत्व आहे. तुळशीमध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो. असं म्हणतात की, नियमीत तुळशीच्या रोपट्याची पूजा केल्याने घरामध्ये सुख-समृद्धीचा वास होतो. प्रत्येक घरामध्ये तुळशीचे रोपटे असते. असं म्हणतात ज्या घरातील तुळस नेहमी हिरवीगार असते. तिथे सकारात्मक ऊर्जेचा संचार असतो. तुळशीची पूजा केल्याने देवी लक्ष्मीसोबतच नारायणांचा देखील आर्शिवाद प्राप्त होतो. वास्तू शास्त्रात तुळशीसोबतच तुळशीच्या कुंडीबाबत देखील काही महत्त्व सांगण्यात आलंय. कुंडीवर ही चिन्ह काढल्यास अनेक सकारात्मक बदल होतात.

तुळशीच्या कुंडीवर काढा ‘ही’ शुभ चिन्ह

स्वास्तिक


घराच्या दारावर किंवा मंदिरामध्ये स्वास्तिक चिन्ह काढणं शुभ मानलं जात. असं म्हणतात की, या चिन्हामुळे घरामध्ये देवी लक्ष्मीचा वास होतो. त्यामुळे तुळशीच्या रोपट्यावर देखील स्वास्तिक चिन्ह तयार करणं शुभ मानलं जातं. यामुळे देवी लक्ष्मीचा नाही तर श्री विष्णूंचा देखील आर्शिवाद प्राप्त होतो.

ओम


ओम चिन्हाला हिंदू धर्मात महत्वाचे स्थान आहे. तुळशीच्या कुंडीवर ओम चे चिन्ह काढणं देखील शुभ मानलं जातं. या चिन्हाला ईश्वराचे वाचक म्हटलं जातं.


हेही वाचा :

Vastu Tips : घरामध्ये 2024 चे नवे कॅलेंडर लावण्यापूर्वी जाणून घ्या ‘या’ महत्वाच्या गोष्टी

First Published on: January 1, 2023 6:45 PM
Exit mobile version