Vastu Tips : तुळशी शेजारी कधीही ठेऊ नयेत ‘या’ गोष्टी

Vastu Tips : तुळशी शेजारी कधीही ठेऊ नयेत ‘या’ गोष्टी

हिंदू धर्मात तुळशीच्या रोपट्याचे खूप महत्व आहे. तुळशीमध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो. असं म्हणतात की, नियमीत तुळशीच्या रोपट्याची पूजा केल्याने घरामध्ये सुख-समृद्धीचा वास होतो. प्रत्येक घरामध्ये तुळशीचे रोपटे असते. असं म्हणतात ज्या घरातील तुळस नेहमी हिरवीगार असते. तिथे सकारात्मक ऊर्जेचा संचार असतो. तुळशीची पूजा केल्याने देवी लक्ष्मीसोबतच नारायणांचा देखील आर्शिवाद प्राप्त होतो. वास्तू शास्त्रानुसार कधी कधी आपण तुळशीच्या रोपट्यासंबंधीत काही अशा चूका करतो. ज्यामुळे व्यक्तीच्या आयुष्यावर त्याचा गंभीर परिणाम पाहावे लागतील.

तुळशी शेजारी ठेऊ नये ‘या’ गोष्टी

तुळशीमध्ये कधीही गणपतीची मूर्ती/फोटो ठेऊ नये. कारण, एका पौराणिक कथेनुसार श्री गणेशांनी तुळशीला शाप दिला होता. त्यामुळे श्री गणेशांच्या पूजेमध्ये देखील तुळस वर्जित असते.

वास्तूशास्त्रानुसार, तुळशीच्या रोपट्यामध्ये कधीही शिवलिंग ठेऊ नये. कारण तुळस केवळ श्री विष्णूंना प्रिय आहे. तुळशीचे पूर्वजन्मात वृंदा नाव होते तसेच जालंधर नावाच्या राक्षसाची ती पत्नी होती. जालंधर राक्षस अनेकांचा छळ करायचा ज्याच्या त्रासाला कंटाळून महादेवांनी त्याचा वध केला. त्यामुळेच महादेवांच्या पूजेत तुळशीचा वापर केला जात नाही.

तुळशीला खूप पवित्र आणि देवी स्वरुप मानले जाते. त्यामुळे तिच्या आसपासचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवायला हवा. वास्तू शास्त्रानुसार तुळशीच्या आसपास कचऱ्याचा डब्बा किंवा अस्वच्छ ठेवल्याने आर्थिक हानी होते.

तुळशीच्या रोपट्याजवळ कधीही झाडू ठेऊ नये, कारण झाडूचा वापर साफ-सफाई करण्यासाठी करतो. त्यामुळे झाडू तुळशीशेजारी ठेवल्याने घरामध्ये दरिद्रता येते.

तुळशीच्या रोपट्याजवळ कधीही चप्पल ठेऊ नये, कारण असं केल्यास देवी लक्ष्मीचा अपमान होऊ शकतो.

 


हेही वाचा :

Vastu Tips : घरात सतत आजारपण सुरु आहे? ‘हे’ वास्तू दोष आजचं करा दूर

First Published on: July 18, 2023 6:30 PM
Exit mobile version