उल्हासनगरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून ५ जणांचा मृत्यू

उल्हासनगरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून ५ जणांचा मृत्यू

उल्हासनगरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून ५ जणांचा मृत्यू

उल्हासनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शुक्रवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास बँक ऑफ बडोदा समोर, नेहरु चौक उल्हासनगर येथील साई सिद्धी इमारती मधील पाचव्या मजल्यापासून तळ मजल्यापर्यंत स्लॅब कोसळला. या दुर्घटनेत आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस कर्मचारी रुग्णवाहिकेसह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहेत. इमारतीमध्ये शोधकार्य सुरु असून अद्याप ३ ते ४ व्यक्ती इमारतीत अडकल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळी मदतीसाठी ठाणे महानगरपालिकेची TDRF टिम रवाना झाली आहे. (5 killed in Ulhasnagar building slab collapse)

घटनेची माहिती मिळताच अग्निशमक दलाचे अधिकारी वि कर्मचारी, पालिका अधिकारी, पोलीस कर्मचारी यांच्यासह आमदार कुमार आयलानी, नगरसेवक राजेश वाधारिया, डॉ. प्रकाश नाथानी यांनी घटनास्थळी धाव घेऊन रेस्क्यू ऑपरेशन सुरु केले. या दुर्घटनेत पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून रात्री उशिरापर्यंत दोन जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. काही जण मलब्याखाली अडकले असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. रात्री उशिरापर्यंत मलबा काढण्याचे काम सुरु होते.

१५ दिवसांपूर्वी उल्हासनगरमध्ये मोहिनी इमारतीचा स्लॅब कोसळून ५ जणांचा मृत्यू झाला होता. तर त्यात १० जण जखमी झाले होते. त्यानंतर पुढील दोन दिवसात आणखी दोन इमारतींचे स्लॅब आणि प्लॉस्टर पडल्याने त्या इमारती सील करण्यात आल्या होत्या. मोहिनी इमारतीची घटना ताजी असताना साई सिद्धी इमारतीत ही घटना घडली. या इमारतीमध्ये एकूण २९ फ्लॅट आहेत. इमारतीतील रहिवाश्यांची सोय थारासिंग दरबार येथे करण्यात आली आहे.


हेही वाचा – Money laundering case: बिल्डर आणि चित्रपट निर्माते युसूफ लकडावालाला ईडीने केले अटक

First Published on: May 28, 2021 11:26 PM
Exit mobile version