ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना कोरोनाचा संसर्ग; ट्विटरवर दिली माहिती

ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना कोरोनाचा संसर्ग; ट्विटरवर दिली माहिती

बिग बींवर होते ९० कोटींचे कर्ज, पैसे मागण्यासाठी लोक घरी यायचे

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्वतः अमिताभ बच्चन यांनी ट्विट करत याची माहिती दिली आहे. त्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच त्यांचे कुटुंबिय आणि घरातील कर्मचाऱ्यांची देखील कोरोना चाचणी झाली आहे, मात्र त्यांचे अहवाल अद्याप आलेले नाहीत. आपल्या ट्विटमध्ये अमिताभ बच्चन यांनी मागच्या दहा दिवसांत त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना कोरोनाची चाचणी करण्याचे आवाहन केले आहे.

दोनच दिवसापूर्वी शोलेतील सुरमाँ भोपाली हे पात्र रंगवणारे विनोदी अभिनेते जगदीप यांचे निधन झाले होते. त्यावर अमिताभ बच्चन यांनी ब्लॉग लिहून एक एक जण या इंडस्ट्रीला सोडून जात असल्याची खंत व्यक्त केली होती. “जगदिप यांनी स्वतःची अशी वेगळी अभिनयाची शैली निर्माण केली होती. मला त्यांच्यासोबत काही चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. शोले आणि शहेनशहा मधील त्यांच्या भूमिका दिर्घकाळ लक्षात राहतील.”,असेही अमिताभ बच्चन यांनी ब्लॉगमध्ये लिहिले होते.

 

 

First Published on: July 11, 2020 10:58 PM
Exit mobile version