Corona Live Update: देशात १,४८६ नवीन रुग्ण, एकूण आकडा २०,४७१

Corona Live Update: देशात १,४८६ नवीन रुग्ण, एकूण आकडा २०,४७१

कोरोना व्हायरस लाईव्ह अपडेट

मागच्या २४ तासांत देशभरात कोरोनाबाधित रुग्णांमध्ये १,४८६ रुग्णांची वाढ झाली आहे. तर एकूण रुग्णसंख्या २०,४७१ वर पोहोचली आहे. तसेच आतापर्यंत ६५२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 


 

देशात लॉकडाऊनचा दुसरा टप्पा जाहीर केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २७ एप्रिल रोजी देशातील सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे हा संवाद साधला जाणार आहे.

 


अंधेरी येथील रेल्वे पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या सुरेखा बेराडे (२५) या महिला पोलिसाने गोरेगावमधील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बातमी समोर येत आहे. आत्महत्येचा तपास वनराई पोलीस ठाण्यामार्फत केला जात आहे.


भाटिया हॉस्पिटलयातील २ डॉक्टर, ५ नर्स आणि एका सुरक्षारक्षकाची कोरोना तपासणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे भाटिया हॉस्पिटलमधील कोरोनाबाधित डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांची संख्या ४३ वर पोहोचली असल्याची माहिती हॉस्पिटल प्रशासनाने दिली.


 

महापे येथील टीटीसी MIDC इंडस्ट्रीयल इस्टेटमधील एकाच आयटी कंपनीतील १९ कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. बँकिंग क्षेत्राशी संबंधित असलेली ही कंपनी असल्याचे सांगितले जाते. अत्यावश्यक सेवेचे नियम आण अटी पाळून ही कंपनी सुरु होती. त्यानंतर आता पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांना वाशी येथील कोविड रुग्णालयात हलविण्यात आले आहे.


 

कोरोनाच्या संकटापासून देशाला वाचविण्यासाठी आरोग्य कर्मचारी जीवाची बाजी लावून काम करत आहेत. मात्र तरिही काही समाजकंटक डॉक्टरांवर हल्ले करत आहेत. अशा लोकांना धडा शिकवण्यासाठी आता कायद्यात बदल करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन संसर्गजन्य रोग कायदा, १८९७ मध्ये बदल करण्यात आले असल्याचे सांगितले. आता डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्याच्या विरोधात अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. अशा आरोपीला ३ महिने ते ५ वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते.

 


आरोग्य मंत्रालयातर्फे दररोज दुपारी चार वाजता कोरोना विषाणू संदर्भात पत्रकार परिषद घेतली जाते. मात्र आज ही पत्रकार परिषद रद्द करण्यात आल्याचे कळते आहे. आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल रोज पत्रकार परिषदेला संबोधित करत असायचे.

 


केंद्र सरकारचा नवा अध्यादेश आजपासून देशभरात लागू!

डॉक्टर, नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ले होण्याच्या घटना समोर आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर आता यांना संरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने मोठ्या निर्णयाची घोषणा केली आहे. नव्या निर्णयानुसार आता डॉक्टर, नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ले करणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल होईल. वरीष्ठ निरीक्षकाच्या पातळीवर या हल्ल्याची चौकशी होईल. ३० दिवसांत याची चौकशी पूर्ण होईल. एका वर्षाच्या आत या प्रकरणाचा निर्णय केला जाईल.

केंद्र सरकारचा मोठा निर्णय, डॉक्टरांवर हल्ले करणाऱ्यांची आता खैर नाही!


येत्या ८ दिवसांत म्हणजेच ३० एप्रिलपर्यंत मुंबईत तब्बल ४२ हजार ६०४ रुग्ण असतील आणि १५ मेपर्यंत हाच आकडा ६ लाख ५६ हजारांपर्यंत असू शकेल असा अंदाज या पथकाने व्यक्त केला आहे. आत्तापर्यंत मुंबईत ज्या वेगाने रुग्णसंख्या वाढतेय, त्या गणिताच्या आधारे हे अंदाज केंद्रीय आरोग्य विभागाच्या विशेष पथकाने वर्तवला आहे.

मुंबईत होणार रुग्णसंख्येचा विस्फोट, १५ मेपर्यंत असतील ६.५ लाख कोरोनाग्रस्त!


पालघर मॉब लिंचिंग – ‘घटना घडली, तेव्हा जमावामध्ये ‘ओये बस’, ‘ओये बस’ असं तिथले लोकं म्हणत होते. पण त्याचा अपभ्रंश ‘शोएब बस’, शोएब बस’ असा करण्यात आला आणि त्यातून या घटनेला वेगळा अर्थ देण्यात आला’, असं गृहमंत्री म्हणाले. मुलं पळवून नेणारी टोळी सक्रिय झाली असल्याच्या अफवेतून हा प्रकार घडल्याचं देखील अनिल देशमुखांनी नमूद केलं.

पालघर मॉब लिंचिंग : हल्लेखोरांमध्ये एकही मुस्लीम बांधव नव्हता, गृहमंत्र्यांचा खुलासा


राज्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच असून आता एकूण रुग्णांची संख्या ५ हजारांच्याही वर गेली आहे. मात्र तरी देखील लोकं काळजी न घेता अनावश्यक कामांसाठी घराबाहेर फिरताना दिसत आहेत. विशेषत: मुंबई आणि पुणे या दोन शहरांमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असून देखील तिथे २० एप्रिलनंतर लॉकडाऊनचे नियम शिथिल करताच लोकं घराबाहेर पडू लागले. या पार्श्वभूमीवर मुंबई आणि पुण्यात देण्यात आलेली काही प्रमाणातली शिथिलता देखील रद्द करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे.


जितेंद्र आव्हाड यांना मंगळवारी रात्री उशिरा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ठाण्याच्या प्रसिद्ध ज्युपिटर रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं आहे. त्यांची ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्यामुळे ते अॅडमिट झाल्याची माहिती मिळत आहे.

रात्री उशिरा जितेंद्र आव्हाड रुग्णालयात दाखल!

First Published on: April 22, 2020 11:16 PM
Exit mobile version